संरक्षण मंत्रालय
मादागास्कर येथील अँसिराना बंदरात आयएनएस केसरी दाखल
Posted On:
29 MAY 2020 10:06PM by PIB Mumbai
मिशन सागर अंतर्गत भारतीय नौदलाचे जहाज केसरीने 27 मे 2020 रोजी मादागास्कर येथील अँसिराना बंदरात प्रवेश केला. कोविड -19 महामारीच्या या कठीण परिस्थितीत भारत सरकार परदेशी देशांना अनुकूल मदत पुरवित आहे आणि त्याचाच भाग म्हणून आयएनएस केसरी मादागास्करच्या लोकांसाठी कोविड संबंधित जीवनावश्यक औषधे घेऊन गेले आहे.
भारत सरकारकडून मादागास्कर सरकारच्या ताब्यात औषधे देण्याचा अधिकृत समारंभ 29 मे 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास मादागास्करचे परराष्ट्र मंत्री एच.ई. एम तेहिंद्राझानारीवेलो लिवा डजाकोबा आणि भारतातर्फे मादागास्कर मधील भारतीय राजदूत अभय कुमार उपस्थित होते.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर मादागास्करला केलेली मदत म्हणजे भारत सरकारच्या याविषयीच्या आवाक्याची व्याप्ती आहे. कोविड-19 महामारी आणि त्याच्या परिणामी अडचणींशी लढण्यासाठी दोन्ही देशांमधील विद्यमान उत्कृष्ट संबंधांवर ‘मिशन सागर’ आधारित आहे. हे उपयोजन सुरक्षा आणि प्रांतातील सर्वांसाठी “सागर” या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुरूप करते आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांशी असलेल्या संबंधांना भारताने दिलेले महत्त्व अधोरेखित करते. या कामकाजाची प्रक्रिया भारत सरकारची परराष्ट्र मंत्रालये आणि इतर संस्थांसमवेत समन्वय साधून केली जात आहे.
****
B.Gokhale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627760)
Visitor Counter : 242