भारतीय निवडणूक आयोग

सीमांकन आयोगाची बैठक

Posted On: 28 MAY 2020 11:22PM by PIB Mumbai

 

29 एप्रिल 2020.रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सीमांकन आयोगाची 28 मे 2020 रोजी बैठक झाली.

तत्पूर्वी  कोविड 19 महामारीमुळे  सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे पहिल्या बैठकीच्या आयोजनाला थोडा विलंब झाला होता. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि जम्मू व काश्मीर केंद्र शासित प्रदेशाकडून राज्य निवडणूक आयुक्तांच्या तपशिलाविषयी माहिती मिळाली आहे.

सीमांकन कायदा 2002 अन्वये आवश्यक सहकारी सदस्यांचे नामांकन लोकसभेकडून मिळाले आहे. आसाम आणि मणिपूर विधानसभेच्या सहकारी सदस्यांची नामांकनेही  प्राप्त झाली आहेत.

जनगणनेची आवश्यक आकडेवारी रजिस्ट्रार जनरल आणि भारतीय जनगणना आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाली आहे. कोणत्याही प्रलंबित माहितीसाठी संबंधित राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश आयोगाने दिले. तसेच आयोगाने संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून इतर आवश्यक माहिती / नकाशा एका ठराविक मुदतीत मागवण्यासही सांगितले आहे.

 

M.Jaitly/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1627608) Visitor Counter : 110