कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडून जम्मू आणि काश्मीरमधील कोविड-19 च्या सद्य परिस्थितीचा आढावा
Posted On:
27 MAY 2020 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2020
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात मोठ्या संख्येने लोक परत येत असल्यामुळे कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य क्षेत्राचा विकास, राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज जम्मू आणि काश्मीर मधील कोविड-19 च्या उद्रेकाचा आढावा घेतला. अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जम्मू-काश्मीर विभागाचे आरोग्य सेवा संचालक आणि जिल्ह्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला.
यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थितीबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, प्रकरणांमध्ये वाढ होण्याचा टप्पा आता पार झाला आहे कारण याला मोठ्या संख्यने लोक या केंद्रशासित प्रदेशात परत येत होती त्याच्याशी जोडण्यात आले होते परंतु या परत येणाऱ्या लोकांना कोविड-19 ची चाचणी करणे बंधनकारक होते. त्यांनी सांगितले की, कोविड-19 च्या प्रकरणांचा शोध घेणे ही एक सकारात्मक बाब होती कारण कोविड बाधित रुग्णाचे त्वरित विलगीकरण करण्यात आले, ज्यामुळे कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे शक्य झाले. त्यांनी सांगितले की, चाचणी क्षमता देखील वाढली असून दर एक लाक लोकांमागे 10,000 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आरोग्य अधिकारी आयसीएमआर अॅप वापरत होते ज्यामुळे चाचणी प्रक्रियेची वेळ कमी होऊन तीन दिवसावर आली आहे. डॉ. सिंह यांना माहिती देण्यात आली की कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या कोविड-19 रूग्णांचा शोध घेण्यासाठी सर्व कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्काचा मोठ्या प्रमणात शोध घेण्यात येत आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी केंद्रशासित प्रदेशाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सल्ला दिला की, रुग्णसंख्या वाढीमुळे घाबरून जाण्याची गरज नाही, केंद्रशासित प्रदेश चांगले काम करत आहे, याची लोकांना खात्री दिली पाहिजे आणि सर्व बाधित रुग्णांची केवळ ओळखच पटली नसून विलगीकरण केंद्रात त्यांच्यावर प्रभावी उपचार देखील होत आहेत. ते म्हणाले की रेड झोन हे लोकांच्या सुरक्षेसाठी आणि विषाणूच्या नियंत्रणासाठी असल्याने ते लोकांच्या फायद्यासाठी होते हे लोकांना सांगा. डॉ. सिंह म्हणाले की, लोकांची वाढती हालचाल/प्रवास लक्षात घेता प्रकरणांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. ते म्हणाले की, कोरोना विषाणूशी यशस्वीरीत्या लढा देण्यासाठी लोकांनी सर्व सावधगिरी बाळगून आपल्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे आणि या सर्व गोष्टी आता आपल्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे.
S.Thakur/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627224)
Visitor Counter : 272