इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आरोग्य सेतूचा सोर्स कोड (Source Code)आता सार्वजनिक

Posted On: 26 MAY 2020 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2020

 

कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2 एप्रिल 2020 रोजी भारताने  आरोग्य सेतू ॲप सुरु केले.रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा ब्लू टूथ आधारित शोध, संभाव्य हॉट स्पॉट शोधणे,कोविड-19 विषयी संबंधित माहितीचा प्रसार करणे या उद्देशाने हे  ॲप आणले आहे. 26 मे पर्यंत या ॲपचे 114 दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्ते असून रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठीच्या जगातल्या इतर कोणत्याही ऐपच्या वापरकर्त्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. 12 भाषात हे ॲप उपलब्ध असून अँड्रॉइड,आयओएस आणि केएआयओएस वर आहे. नागरिक, स्वतःचे, आप्तस्वकीयांचे आणि देशाचे कोविडपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने आरोग्य सेतूचा उपयोग करत आहेत.युवा तर आरोग्य सेतूला बॉडीगार्ड म्हणून संबोधत आहेत. पारदर्शकता, खाजगीपणा आणि सुरक्षितता हे या ॲपचे महत्वाचे स्तंभ असून, भारताच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे खुले स्त्रोत सॉफ्टवेअर संदर्भातल्या धोरणाला अनुसरून आहे. आरोग्य सेतू ॲपचा सोर्स कोड आता सार्वजनिक करण्यात आला आहे. अँड्रॉइड आवृत्तीसाठीचा सोर्स कोड समीक्षा आणि सहकार्यासाठी https://github.com/nic-delhi/AarogyaSetu_Android.git. वर उपलब्ध आहे. आयओएस आवृत्ती एप्लिकेशन येत्या दोन आठवड्यात ओपन सोर्स म्हणून जारी करण्यात येईलआणि त्यानंतर सर्व्हर कोड जारी करण्यात येईल. आरोग्य सेतू ॲपचे सुमारे 98% वापरकर्ते हे अँड्रॉइड प्लॅटफॉर्म वर आहेत.

विकासक समुदायासाठी सोर्स कोड खुला करणे हे पारदर्शकतेच्या तत्वाप्रती जारी असलेली आमची कटिबद्धता आणि सहयोग दर्शवते.आरोग्य सेतू ऐप विकसित करणे म्हणजे सरकार, उद्योग, संशोधक आणि नागरिक यांच्या सहयोगाचे लक्षणीय उदाहरण आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आपल्या देशाच्या प्रतिभावान युवा तज्ञांच्या अहोरात्र कठोर मेहनतीचे फळ म्हणजे हे जागतिक दर्जाचे उत्पादन आहे.पब्लिक डोमेन मधे म्हणजे जनतेसाठी  सोर्स कोड जारी करून आम्ही  हा सहयोग विस्तारून आणि देशातल्या प्रतिभावान बुद्धिमत्तेच्या युवा आणि  नागरिक यांच्यातल्या सर्वोच्च तंत्र  नैपुण्याचा लाभ घेत या महामारीविरोधातल्या लढ्यात आघाडीवर असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मजबूत सुरक्षित तंत्रज्ञा आधारित उपाय उभारण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

हे ॲप सुरु झाल्यापासून 8 आठवड्यातच अनेक बाबीत अग्रेसर असल्याचे आढळले आहे.रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यातल्या आणि स्व मुल्यांकन करणाऱ्या जगातल्या इतर ॲपच्या तुलनेत याची पोहोच आणि प्रभाव कदाचित सर्वात अधिक आहे. 114 दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्त्यांपैकी दोन तृतीयांश जणांनी आपल्याला कोविड-19 चा धोका किती आहे याबाबत स्व मुल्याकन चाचणी केली. 5,00,000 ब्लू टूथ संपर्क ओळखण्यासाठी या ॲपची मदत झाली. कोविड बाधित असल्याचे ब्लू टूथसंपर्कातून समोर आलेल्या आणि स्व मुल्याकनातून सहायाची आवश्यकता असल्यचे वर्गीकरण केलेल्या समवेत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण संपर्क करते. आतापर्यंत या मंचाने 9,00,000 पेक्षा अधिक वापरकर्त्यांना विलगीकरण,सावधगिरी आणि चाचणी बाबत सल्ला दिला आहे. ज्यांना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला त्यापैकी सुमारे 24 % कोविड-19 बाधित आढळून आले.याची तुलना  26 मे पर्यंत एकूण 3126119 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 145380 जण कोविड बाधित म्हणजे कोविड बाधित आढळण्याच्या 4.65 % दराशी केली जाऊ शकते. याचाच अर्थ संपर्कातल्या व्यक्तींचा शोध घेऊन  चाचणीची गरज आहे अशापर्यंत पोहोचण्याच्या लक्ष्यकेन्द्री प्रयत्नात याची मदत होत असून या महामारीला रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नात मोठी भर पडत आहे. ब्लू टूथ संपर्क आणि डाटा लोकेशनच्या विश्लेषणातूनकोविड बाधित मोठ्या संख्येने आढळण्याची शक्यता असणारे संभाव्य हॉटस्पॉट निश्चित करण्यासाठी आणि राज्य सरकार,जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्याना, ही महामारी रोखण्यासाठी लवकर पावले उचलण्यासाठी मदत होत आहे.कोविड-19 बाधित लोकांशी संपर्क साधणे, लोकसंख्या स्तरावर मॉडेल आणि देशाच्या विभिन्न भागात कोविड-19 चे अस्तित्व याबाबत एक नवा विचार ठेवून या रोगाचा लाक्षणिक ढाचा तयार करण्याच्या या नव्या पद्धतीने आरोग्य सेतुने देशभरात उप टपाल कार्यालय स्तरावर 3500 पेक्षा जास्त हॉटस्पॉट्स शोधले. आज देशातनव्याने निर्माण होणारे  सुमारे 1264 हॉटस्पॉट शोधण्यात आले आहेत, या ऐपशिवाय हे शोधणे शक्य नव्हते.उदाहरणार्थ विशिष्ट तारखेला 3 बाधित असणाऱ्या जिल्ह्यात  आरोग्य सेतुने हॉटस्पॉटची शक्यता वर्तवली त्यानंतर 15 दिवसात 82 बाधितांची नोंद झाली.ब्लू टूथ आधारित संपर्कातल्या व्यक्तींचा शोध,हॉट स्पॉटची निश्चिती यांच्या  अनोख्या मिलाफातून संसर्ग साखळी खंडित  करण्यासाठी आणि आलेख सपाट करत जीवन वाचवण्यासाठी प्रभावी मदत होत आहे.

114 दशलक्ष पेक्षा जास्त वापर कर्तेअसणाऱ्या झपाट्याने पुढे येणाऱ्या होणाऱ्या उत्पादनाचा सोर्स कोड जारी करणे हे आव्हानात्मक आहे.सोर्स कोड विकसित करणे आणि राखणे ही आरोग्य सेतू टीम आणि विकासक समुदाय या दोन्हींसाठी प्रचंड मोठी जबाबदारी आहे.

ओपन सोर्स विकास सहाय्य प्रक्रियेचे व्यवस्थापन  करण्याचे काम एनआयसी करणार आहे.आरोग्य सेतू सोर्स कोड अपाचे परवाना आवृत्ती 2.0 अंतर्गत प्राप्त आहे आणि जसे आहे तसे या  आधारावर उपलब्ध आहे.सोर्स कोडमधे बदलासह पुन्हा वापर करायचा असल्यास विकासकाची   आवश्यकता  आहे.अधिक तपशील वारंवार विचारले जाणारे प्रश्न या अंतर्गत https://www.mygov.in/aarogya-setu-app/ इथे उपलब्ध आहे.

कोड ओपन सोर्स करताना केंद्र सरकारने आरोग्य सेतू अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी यामध्ये कोणतीही त्रुटी असेल तर ती शोधण्यासाठी आणि कोड सुधारण्यासाठी विकासक समुदायाकडे मदत मागितली.या उद्देशाने सरकारने सुरक्षा संशोधकाशी भागीदारीने बग बाउंटी कार्यक्रम सुरु केला.आरोग्य सेतू सुरक्षितता वाढवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी याचा उपयोग करत वापर कर्त्यांचा भरवसा  वृद्धिगत करण्याचा हेतू आहे. बग बाउंटी बाबत विस्तृत माहिती वेगळी देण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती माय गव्ह च्या नाविन्य पूर्ण पोर्टल वर https://innovate.mygov.in/ उपलब्ध आहे.

कोड आणि उत्पादन डिझाईन सार्वजनिक करून केंद्र सरकार जागतिक हितासाठीची आपली कटिबद्धता सिद्ध करत आहे. कोविड -19 शी लढा देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून मिळालेली माहिती  आणि उपलब्ध उपायाचे लाभ भारत जगालाही देऊ इच्छितो. आपण एकजुटीने याचा मुकाबला करू शकतो,या महामारीशी लढा देण्यात आघाडीवर असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य्ब  कर्मचार्यांना आम्ही सहकार्य जारीच ठेवू.

मी सुरक्षित,आम्ही सुरक्षित, भारत सुरक्षित.

 

M.Jaitly/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1627160) Visitor Counter : 634