वस्त्रोद्योग मंत्रालय
पीपीई कव्हरऑल्सचे प्राथमिक चाचणी नमुने आता नऊ अधिकृत प्रयोगशाळांद्वारे चाचणी करून प्रमाणित केले जात आहेत
चाचणी मानके कोविड -19 संबंधी डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्वे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आखून दिलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार अनुरूप
खरेदी संस्थांनी पीपीई कव्हरऑल्समधून यादृच्छिक नमुने गोळा करून मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून त्यांची चाचणी करून घ्यावी
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2020 8:20PM by PIB Mumbai
भारतातील पीपीई कव्हरऑल्स हे आरोग्य व्यावसायिकांच्या सुरक्षेचा विचार करून बनवले जात आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नमूद केलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार पीपीई कव्हरऑल्स प्राथमिक चाचणी नमुने आता नऊ अधिकृत प्रयोगशाळांद्वारे चाचणी करून प्रमाणित केले आहेत.
चाचणीचा दर्जा कोविड -19,संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांशी अनुरूप आहे आणि ‘सिंथेटिक ब्लड पेनिट्रेशन रेसिस्टन्स टेस्ट' साठी ISO 16603 Class 3 नुसार चाचणी घेण्यात आली आहे. पीपीईची रचना त्याचा वापर करणाऱ्याच्या संपूर्ण संरक्षणासाठी कोणत्याही द्रव किंवा एरोसोल कणांना प्रतिबंध करणारी आहे.
कव्हरऑल्सच्या आतील भागात विशिष्ट प्रमाणित कोड छापलेल्या प्रमाणित संस्थांकडून सामुग्री खरेदी करण्याचा सल्ला सर्व सरकारी खरेदी संस्था आणि खाजगी रुग्णालयांना देण्यात आला आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या www.texmin.nic.in या संकेतस्थळावर दिलेल्या वेबलिंकवर प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर प्रमाणित उत्पादकांकडून सामुग्री खरेदी करण्याची विनंती वापरकर्त्यांना आणि खरेदी संस्थांना करण्यात येत आहे.
तसेच खरेदी संस्थांनी पीपीई कव्हरआल्समधून यादृच्छिक नमुने गोळा करून www.texmin.nic.in वर उपलब्ध असलेल्या नऊ (9) मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून हे नमुने तपासून घ्यावेत असा सल्ला देण्यात आला आहे.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1626978)
आगंतुक पटल : 431