रेल्वे मंत्रालय

1 जूनपासून सुरू होणाऱ्या 200 रेल्वेगाड्यांच्या तिकिटांसाठी मोठ्या आरक्षण वेगात

1413277 प्रवासी क्षमता असलेल्या या गाड्यांसाठी कालपासून 652644 तिकिटांचे  ऑनलाईन आरक्षण

या 200 विशेष सेवा 1 मेपासून चालवण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त आणि 12 मे 2020 पासून चालवण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित (30 गाड्या) गाड्यांव्यतिरिक्त चालवल्या जाणार

Posted On: 22 MAY 2020 9:32PM by PIB Mumbai

 

1 जून 2020 पासून भारतीय रेल्वेसेवा अंशतः सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी चर्चा करूनच रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वे देशभरात दररोज 200 प्रवासी गाड्यांचे  परिचालन सुरू करणार आहे. या गाड्या 1 जून 2020 पासून धावतील आणि या सर्व गाड्यांसाठीचे आरक्षण  21 मे 2020 पासून सुरू झाले आहे.  या विशेष सेवा 1 मेपासून सुरू झालेल्या  सध्याच्या श्रमिक विशेष गाड्या आणि  12 मे 2020 पासून सुरू झालेल्या विशेष वातानुकूलित गाड्यांव्यतिरिक्त  (30 गाड्या) आहेत.

आयआरसीटीसीचे  संकेतस्थळ किंवा मोबाइल अपद्वारे या गाड्यांच्या तिकिटांसाठीचे  ऑनलाईन आरक्षण केले जात आहे. भारतीय रेल्वेने काल 21 मे 2020 ला आरक्षण खिडक्या, सामायिक सेवा केंद्र (सीएससी) आणि  तिकिटिंग एजंट्समार्फतही तिकिटांच्या आरक्षणास परवानगी दिली.

या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण 21 मेपासून सुरू झाले आणि 22 मे 2020 रोजी 20:14 (8 वाजून 14 मिनिटांपर्यंत ) वाजता, सर्व 200 गाड्या आरक्षणासाठी  प्रणालीत उपलब्ध झाल्या.  1413277 प्रवासी क्षमता असलेल्या या गाड्यांसाठी 652644 ऑनलाईन तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत.

 

M.Jaitly/S.Kakade/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1626382) Visitor Counter : 43