अर्थ मंत्रालय

एक एप्रिल 2020 पासून 26,242 कोटी रुपये परतावे देण्यात आले


Posted On: 22 MAY 2020 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020

 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने एक एप्रिल ते 21 मे 2020 या कालावधीत, 16,84,298  करपात्र व्यक्तींचे 26,242 कोटी रुपयांचे करपरतावे दिले आहेत.

या कालावधीत, 15,81,906 करपात्र व्यक्तींचे 14,632 कोटी रुपयांचे प्राप्तिकर परतावे देण्यात आले आहेत तर, 1,02,392 करपात्र व्यक्तींचे 11,610 कोटी रुपयांचे कॉर्पोरेट करपरतावे देण्यात आले आहेत.  

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पैकेजची घोषणा केल्यानंतर, कर परतावे देण्याच्या प्रक्रियेला आणखी गती देण्यात आली असून जलदगतीने हे परतावे बँकेत जमा केले जात आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने, गेल्या, म्हणजेच 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात, 9 ते 16 मे या कालावधीत 2050.61 कोटी रुपयांची रक्कम 37,531प्राप्तिकर पात्र व्यक्तींच्या खात्यात जमा केली आहे. तसेच, 2878 कॉर्पोरेट करपात्र व्यक्तींच्या खात्यात 867.62 कोटी रुपये रक्कम जमा केली आहे. या आठवड्यात, म्हणजेच 17 ते 21 मे या कालावधीत, आणखी 1,22,764 प्राप्तिकरपात्र व्यक्तींच्या खात्यात 2672.97 कोटी रुपये, तर 33,774 कॉर्पोरेट करपात्र खात्यात, यात एमएसएमई, प्रोप्रायटरशिप इत्यादी खात्यांमध्ये 6714.34 कोटी रक्कम जमा करण्यात आली. म्हणजेच, एकूण  1,56,538 करपात्र व्यक्तींच्या खात्यात, 9387.31 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.


* * *

M.Jaitly/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1626117) Visitor Counter : 223