अर्थ मंत्रालय
सरकारवरील कर्जाबाबतच्या स्थितीदर्शक पत्रिकेची 9वी आवृत्ती प्रसिद्ध
Posted On:
22 MAY 2020 5:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2020
सरकारवरील कर्जाबाबतच्या स्थितीदर्शक पत्रिकेची नववी आवृत्ती केन्द्र सरकारने आज प्रसिद्ध केली. भारत सरकारवर एकूण किती कर्ज आहे याबाबतची सविस्तर माहिती आणि विश्लेषण यात केले आहे. केन्द्र सरकार 2010-11 वर्षापासून सरकारवरील कर्जाबाबत याप्रकारची स्थितीदर्शक पत्रिका प्रसिद्ध करीत आहे.
वर्षभरातील कर्ज व्यवहारांबाबत इत्यंभूत माहिती दिल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता राहाते.
केंद्र सरकारची वर्ष 2018-19 मधील वित्तीय तूट, त्याबाबतचे आर्थिक व्यवहार याचा लेखाजोखा यात मांडला आहे.
कर्जावर परिणाम करणाऱ्या संवेदनशील घटकांची यात प्रामुख्याने नोंद घेतली आहे. उदाहरणार्थ कर्ज / जीडीपीचे प्रमाण, व्याजाचा भरणा, महसुल, कर्जाचे अल्पकालीन समभाग/ बाहेरील कर्ज/ एकूण कर्जासंबंधित FRBs याचा सविस्तर आढावा या पत्रिकेत घेतला आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 ते 2021-22 पर्यंत कर्ज व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. याचा केन्द्र सरकारला या काळातील नियोजनासाठी उपयोग होईल.
ही स्थितीदर्शक पत्रिका वित्त मंत्रालयाचे संकेतस्थळ : https://dea.gov.in/public-debt-management वर उपलब्ध आहे.
* * *
B.Gokhale/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626114)
Visitor Counter : 248