पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाबाबत लवकरात लवकर अधिसूचना जारी करण्याची राज्यांची मागणी

Posted On: 21 MAY 2020 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

 

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांबाबत अधिसूचना जारी करण्याच्या मुद्यांवर चर्चा केली.

पश्चिम घाटांच्या जैव विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या भागाचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना केली होती. या समितीने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये पश्चिम घाटांतर्गत येणारे भौगोलिक क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून घोषित करावे अशी शिफारस केली होती. हे भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करणाऱ्या अधिसूचनेचा मसुदा ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. पश्चिम घाटाचे महत्त्व लक्षात घेता  या घाटाचे संरक्षण करण्याची गरज असल्याबाबत या सर्व राज्यांनी सहमती व्यक्त केली. मात्र, या राज्यांनी संबंधित अधिसूचनेत उल्लेख केलेल्या क्षेत्राचा विस्तार आणि त्यामधील व्यवहारांबाबत काही मते मांडली. राज्यांशी संबंधित मुद्यांवर अधिक सविस्तर चर्चा करून त्यावर सहमती व्यक्त करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. पर्यावरण आणि जैवविविधता यांचे संरक्षण करण्यासाठी अधिसूचना लवकरात लवकर जारी करण्याची मागणी या राज्यांनी केली.

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625918) Visitor Counter : 251