ऊर्जा मंत्रालय
अम्फान चक्रीवादळचा सामना करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडून पुरेशी व्यवस्था
आपत्कालीन यंत्रणा पुनःरस्थापित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात
Posted On:
19 MAY 2020 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2020
अम्फान चक्रीवादळ 20.05.2020 रोजी दुपारी धडकण्याची आणि त्याचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठ्यासंदर्भात स्थिती सांभाळण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून असून राज्य सरकारे, त्यांचे ऊर्जा विभाग, वीज निर्मिती आणि पारेषण कंपन्या, ग्रीड ऑपरेटर्स आणि सामग्री पुरवठ्यासाठी उत्पादक आदी संबंधितांशी समन्वय ठेवण्यात येत आहे.
पोसोकोचे राष्ट्रीय भार प्रेषण केन्द्र (एनएलडीसी) आणि पूर्व क्षेत्रीय भार प्रेषण केंद्र (ईआरएलडीसी) मुख्य नियंत्रण केंद्र असतील. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या ऊर्जा विभागाचे वरिष्ठ स्तरांवरचे नोडल अधिकारी यांना आपातकालीन स्थितीला प्रतिसाद देण्यासाठी नेमण्यात आले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या एनटीपीसी, पीजीसीआयएल आणि पोसोको यांनी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि चक्रीवादळमुळे वीजपुरवठ्यावर काही परिणाम झालाच तर राज्य वीज कंपन्यांना साहाय्य करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. पीजीसीआयएल आणि एनटीपीसीने भुवनेश्वर आणि कोलकाता येथे 24x7 कंट्रोल रूम स्थापित केली आहेत. तसेच पीजीसीआयएलने पीजीसीआयएल मुख्यालय / मानेसर येथे एक 24x7 नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे.
नॅशनल ग्रिड ऑपरेटर- पोसोको परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि चक्रीवादळाच्या मार्गाचा माग घेत आहे.
सर्व आरएलडीसीना एनएलडीसीद्वारे 17.05.2020 ला प्रारंभिक सल्ला जारी करण्यात आला होता. एनएलडीसीने आरएलडीसी आणि सर्व संबंधित पारेषण परवानाधारक आणि पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या राज्य भार प्रेषण केंद्रांना (एसएलडीसी) 18.05.2020ला सल्ला जारी करण्यात आला आहे.
पारेषण टॉवर पडल्यास किंवा पारेषण वाहिन्यांचे नुकसान झाल्यास आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे.
पुनर्स्थापना कामांसाठी वाहने आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक कुशल मनुष्यबळाची व्यवस्थाही करण्यात येत आहे. तात्काळ पुरवठ्यासाठी विजेचे खांब , ट्रांसफार्मर्स केबल आदि वस्तूंच्या उत्पादकांना सतर्क करण्यात आले आहे.
राज्य पारेषण वाहिन्या आणि वीजेसबंधी इतर पायाभूत सुविधांबाबत काही नुकसान झाल्यास राज्य वीज कंपन्याना आवश्यक ते साहाय्य दिले जाईल.
S.Thakur/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625689)
Visitor Counter : 258