गृह मंत्रालय
मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या हितासाठी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा लॉकडाऊन उपाययोजनांमधून वगळल्या: अमित शहा
विविध मंडळांना त्यांचे परीक्षा वेळापत्रक सुनियोजित करण्याच्या सूचना; आरोग्य / स्वच्छता नियमांचे पालन करणे अनिवार्य
Posted On:
20 MAY 2020 5:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2020
मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या हितासाठी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना लॉकडाऊन उपाययोजनांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
Taking into consideration the academic interest of large number of students, it has been decided to grant exemption from the lockdown measures to conduct Board examination for classes 10th & 12th, with few conditions like social distancing, face mask etc, for their safety. pic.twitter.com/P4ULsmbPVv
— Amit Shah (@AmitShah) May 20, 2020
लॉकडाऊन उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा उघडण्यास मनाई करण्यात आली असल्याने राज्य शिक्षण मंडळे / सीबीएसई / आयसीएसई इ. द्वारे इयत्ता दहावी व बारावीसाठी घेण्यात येणाऱ्या वार्षिक बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार आणि सीबीएसई कडून बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी निवेदन प्राप्त झाले होते.
त्या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परीक्षांचे आयोजन करण्याच्या अटींची तपशीलवार माहिती दिली आहे. त्या अटी याप्रमाणे:-
- कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही परीक्षा केंद्राला परवानगी दिली जाणार नाही.
- शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य असेल.
- सर्व परीक्षा केंद्रांमध्ये थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझर तसेच सुरक्षित अंतराची तरतूद असावी.
- वेगवेगळ्या मंडळांकडून घेण्यात येणार्या परीक्षा पाहता त्यांचे परीक्षेचे वेळापत्रक सुनियोजित असले पाहिजे.
- विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर नेण्यासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून विशेष बसेसची व्यवस्था केली जाऊ शकते.
अधिकृत संप्रेषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
*****
B.Gokhale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625486)
Visitor Counter : 284
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada