नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

कोणार्क सूर्य मंदिर आणि कोणार्क शहरासाठी भारत सरकारचा शंभर टक्के सौर ऊर्जा प्रकल्प सुरू


10 मेगावॅट ग्रीडने जोडण्यात आलेल्या सौर प्रकल्पाबरोबरच सौरवृक्ष, सौर पेयजल यंत्रणा यांच्यासाठी ऑफ-ग्रीड अनुप्रयोगांचा विचार

Posted On: 20 MAY 2020 3:48PM by PIB Mumbai

 

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) ओडिशा राज्यातल्या कोणार्क सूर्य मंदिर आणि कोणार्क शहरासाठी शंभर टक्के सौर ऊर्जा पुरवण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे. या योजनेची माहिती ऊर्जा आणि  एमएनआरई खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आर.के. सिंग यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, ‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन’नुसार ओडिशामधले ऐतिहासिक कोणार्क शहर हे ‘सूर्य नगरी’ म्हणून विकसित करण्यासाठी भारत सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पर्यटकांसाठी  महत्वपूर्ण असलेल्या प्राचीन सूर्य मंदिर परिसरामध्ये आणि ऐतिहासिक कोणार्क शहरामध्ये शंभर टक्के सौर ऊर्जेचा वापर करून या अक्षय ऊर्जेचे महत्व सांगतानाच आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच जुन्या-नव्यांचा समन्वय साधण्याचा संदेश देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत 10 मेगावॅट ग्रीडशी जोडण्यात येणारा सौर प्रकल्प आणि विविध सौर ‘ऑफ-ग्रीड’ साधने बसवण्यात येणार आहेत. यामध्ये सौरवृक्ष, सौर पेयजल यंत्रणा, बॅटरी स्टोअरेजवर चालणारे ऑफ-ग्रीड सौर ऊर्जा साधनांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 25 कोटी खर्च अपेक्षित आहे, त्यासाठी शंभर टक्के केंद्रीय अर्थसहाय्य मिळणार आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागामार्फत हा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ओडिशा नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी (ओआरईडीए) मार्फत करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे कोणार्क शहराच्या सर्व ऊर्जा विषयक आवश्यकतांची पूर्तता सौरऊर्जेने होवू शकणार आहे.

 

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625479) Visitor Counter : 184