शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जेईई मुख्य, नीट 2020 च्या सराव चाचणीसाठी मोबाईल अ‍ॅप सुरु केले


राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे आयोजित परीक्षा देण्यास तयार असलेले विद्यार्थी आता नव्याने सुरु केलेल्या मोबाईल अ‍ॅपवर सराव चाचणी देऊ शकतील

Posted On: 19 MAY 2020 11:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी ‘नॅशनल टेस्ट अभ्यास’ (राष्ट्रीय चाचणी अभ्यास) नावाचे नवीन मोबाईल अ‍ॅप सुरु केले. उमेदवारांना जेईई मुख्य, नीट यासारख्या ‘एनटीए’च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या परीक्षांसाठी सराव चाचणी देणे शक्य व्हावे, यासाठी ‘एनटीए’ने हे अ‍ॅप विकसित केले आहे. लॉकडाऊनमुळे शैक्षणिक संस्था व ‘एनटीए’ चाचणी-सराव केंद्र (टीपीएस) बंद असल्यामुळे विद्यर्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांच्या घरातच सुरक्षित व सोयी-सुविधानुसार उच्च गुणवत्तेची सराव चाचणी देता यावी, अशी मागणी होत होती, या पार्श्वभूमीवर हे अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना ही सुविधा प्रदान करण्यासोबतच, भारताने एका महत्वपूर्ण क्षेत्रात सामान्य परिस्थिती प्रमाणेच सुविधा प्रदान करत महत्वाची आघाडी घेतली आहे. या अभूतपूर्व संकटामुळे जगभरात महत्वपूर्ण बदल घडून येत आहेत, आपण देखील या संकटाचा सामना नेटाने करत असताना ही महत्वाची झेप घेतली आहे.  

देशभरातील विद्यार्थी आगामी जेईई, नीट व इतर स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करण्यासाठी या विनामुल्य मोबाईल अ‍ॅपचा उपयोग करू शकतात. या चाचण्या सहजपणे डाउनलोड केल्या जाऊ शकतात; व ऑफलाईन राहून या चाचण्या पूर्ण केल्या जाऊ शकत असल्यामुळे इंटरनेटच्या उपलब्धतेची देखील काळजी नाही.

याप्रसंगी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणाले की, “कोणताही विद्यार्थी सराव चाचणी करताना मागे राहू नये आणि विशेषतः कोविड-19 मुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक संस्था व ‘एनटीए’ चाचणी-सराव केंद्र बंद असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, हाच या, वेळेवर सुरु करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपचा उद्देश आहे.”

 

A screenshot of a cell phoneDescription automatically generated A screenshot of a cell phoneDescription automatically generated A screenshot of a cell phoneDescription automatically generated A screenshot of a cell phoneDescription automatically generated

हे अ‍ॅप उपकरणाची गुणवत्ता व नेटवर्क कसेही असले तरीदेखील भारतात सर्व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन किंवा संगणकावर सराव चाचण्या उपलब्ध करुन देईल. अ‍ॅपमध्ये एक ऑफलाइन मोड देखील आहे जेथे विद्यार्थी, मॉक टेस्ट डाउनलोड केल्यानंतर, इंटरनेटशिवाय देखील चाचणी देऊ शकतात. अ‍ॅप अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोन व टॅब्लेटवर कार्यरत राहील. गुगल पे स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. अ‍ॅप लवकरच ‘आयओएस’ वर उपलब्ध होईल. एकदा विद्यार्थ्यांनी अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांना साइन-अप किंवा रजिस्टर करण्यासाठी काही मूलभूत तपशीलांची नोंदणी करावी लागेल, एक विनामूल्य खाते तयार करावे लागेल व नंतर त्यांच्या निवडलेल्या परीक्षेसाठी ते सराव चाचणी देऊ शकतात.

अॅपवर दररोज एक नवीन ‘मॉक टेस्ट’ टाकण्याची ‘एनटीए’ची योजना आहे, जी नंतर विद्यार्थी डाउनलोड करून त्याचा ऑफलाइन सराव करू शकतात. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थी पुन्हा ऑनलाइन चाचणी सादर करू शकतात व त्यांचा चाचणी अहवाल पाहू शकतात. हे स्पष्ट आहे की अॅपचा एक मुख्य फायदा म्हणजे एकदा विद्यार्थ्यांनी चाचणी डाउनलोड केल्यावर ती इंटरनेट कनेक्टिव्हिटी शिवाय अगदी उत्तम प्रकारे कार्य करते, कमी बँडविड्थ असलेल्या भागातही विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर सिद्ध होईल आणि मोठ्या प्रमाणात ऑनलाइन चाचणीच्या मार्गातील अडथळे दूर करेल. त्या व्यतिरिक्त एनटीएने http://nta.ac.in/abhyas/help येथे व्यापक समर्थन प्रणाली विकसित केली आहे. “विद्यार्थ्यांना पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नाला समर्थपणे सोडविण्यासाठी ‘एनटीए’ हे अॅप सुरु झाल्यापासून पहिल्या सात दिवसांसाठी सकाळी 10 ते मध्यरात्री पर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे लाइव्ह निराकरण करणार आहे,” असे मनुष्यबळ विकास मंत्री म्हणाले.

गेल्या वर्षभरात, शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन शिक्षणासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठी डिजिटल वितरणाच्या पलीकडे अनेक नवोन्मेश साकारले आहेत. एनटीए सराव चाचणी अॅपवर आलेल्या चाचणी अहवालात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सविस्तर विश्लेषण देण्यात येते ज्यामुळे विद्यार्थी त्यांच्या प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी त्यांचा वैयक्तिक मार्ग समजून घेऊ शकतील.

*****

S.Pophale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625326) Visitor Counter : 197