रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे विभाग 12 मे 2020 पासून सुरु झालेल्या विशेष गाड्यांमधील विविध वर्गांसाठी मर्यादित प्रतीक्षा यादी जाहीर करणार


या विशेष गाड्यांमध्ये RAC अर्थात  Reservaton Against Cancellation ची सुविधा देण्यात येणार नाही

येत्या 22 मे 2020 पासून धावणाऱ्या गाड्यांसाठी 15 मे 2020 पासून सुरु होत असलेल्या नोंदणी प्रक्रियेत हे बदल लागू करण्यात येणार आहेत

Posted On: 14 MAY 2020 7:30PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने 12 मे 2020 पासून पुन्हा सुरु करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये RAC म्हणजेच Reservaton Against Cancellation ची सुविधा देण्यात येणार नाही असा निर्णय रेल्वे विभागाने जाहीर केला आहे. त्याचबरोबर, या गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध जागांची कमाल मर्यादा लक्षात घेऊनच प्रतीक्षा यादी तयार केली जाईल असे रेल्वे विभागाने ठरविले आहे. 1 AC वर्गासाठी जास्तीत जास्त 20 जागा, Exicutive Class साठी 20 जागा, 2AC वर्गासाठी 50 जागा, 3AC वर्गासाठी 100 जागा तसेच भविष्यात यापैकी ज्या गाड्यांमध्ये Chair Car डब्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्यामध्ये AC Chair Car साठी 100 जागा आणि जर विशेष गाड्यांपैकी एखाद्या गाडीमध्ये Sleeper Class ची सुविधा उपलब्ध होऊ शकत असेल तर त्यासाठी जास्तीतजास्त 200 जागांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल.

रेल्वे विभागाने ज्या विशेष गाड्यांची सेवा 12 मे 2020 पासून सुरु केली आहे त्यांच्या आरक्षण तसेच परताव्याबाबत विभागाने खालील निर्णय घेतले आहेत.

  • प्रतीक्षा यादीसंदर्भातील इतर सर्व नियम आहेत तसेच लागू होतील.
  • तात्काळ तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या तात्काळ कोट्याबाबत काही निर्णय झालेला नाही.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी जागांचा राखीव कोटा, स्त्री प्रवाशांसाठी जागांचा राखीव कोटा आणि दिव्यांग जनांसाठी राखून ठेवण्यात आलेला जागांचा कोटा यांचे प्रमाण आतापर्यंत इतर गाड्यांसाठी लागू असलेल्या नियमांप्रमाणेच असेल.
  • प्रवास सुरु होण्याच्या 24 तास आधी पर्यंत नोंदणी रद्द केल्यास तिकिटाच्या शुल्काच्या 50 % रकमेचा परतावा आणि प्रवास सुरु होण्याआधीच्या 24 तासांत नोंदणी रद्द केल्यास तिकिटाच्या शुल्काचा शून्य परतावा हे नियम रद्द ठेवण्यात आले असून या विशेष गाड्यांची तिकीट नोंदणी रद्द केल्यानंतर रेल्वेच्या तिकीट रद्द आणि परतावा नियम2015 (Cancellation and Refund rule 2015)  नुसार शुल्क परतावा देण्यात येईल.
  • ज्या विशेष गाड्या 22 मे 2020 पासून कार्यान्वित होणार आहेत आणि ज्यांच्या जागांची नोंदणी उद्या म्हणजे 15 मे 2020 पासून सुरु होणार आहे त्या गाड्यांच्या जागांच्या नोंदणीसाठी वरील नियम लागू होतील.

****

B.Gokhale/S.Chitnis/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623866) Visitor Counter : 200