रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेकडून 13 मे 2020 पर्यंत देशभरात 642 “श्रमिक विशेष” गाड्यांची वाहतूक
सुमारे 7 लाख 90,000 प्रवासी आपापल्या राज्यांमध्ये पोहोचले
प्रवाशांसाठी रेल्वे विभागाकडून मोफत जेवण आणि पाण्याची सोय
जे राज्य प्रवासी पाठविणार आणि ज्या राज्यात प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्यांच्या संमतीनंतरच श्रमिक गाड्यांची वाहतूक सुरु
Posted On:
13 MAY 2020 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2020
देशाच्या विविध भागात लॉक डाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना आपल्या मूळ गावी पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार भारतीय रेल्वे विभागाने “श्रमिक विशेष” गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार सुरु झालेल्या गाड्यांच्या वाहतुकीद्वारे आज 13 मे 2020 पर्यंत देशाच्या विविध राज्यातून 642 “श्रमिक विशेष” गाड्यांची सेवा कार्यान्वित झाली. या विशेष गाड्यांमधून प्रवास करून आतापर्यंत सुमारे 7 लाख 90,000 प्रवासी आपापल्या राज्यांमध्ये पोहोचले आहेत. जे राज्य प्रवाशांना पाठविणार आणि ज्या राज्यांमध्ये प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्य सरकारांचे प्रवासी पाठवण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊन त्यांनी प्रवासाला संमती दिल्यानंतरच या विशेष गाड्यांची वाहतूक सुरु केली जात आहे.
आंध्रप्रदेश (3 गाड्या), बिहार (169 गाड्या), छत्तीसगड (6 गाड्या), हिमाचल प्रदेश (1 गाडी), जम्मू-काश्मीर (3 गाड्या), झारखंड (40 गाड्या), कर्नाटक (1 गाडी), मध्य प्रदेश (53 गाड्या), महाराष्ट्र (3 गाड्या), मणिपूर (1 गाडी), मिझोरम (1 गाडी), ओदिशा (38 गाड्या), राजस्थान (8 गाड्या), तामिळनाडू (1 गाडी), तेलंगणा (1 गाडी), त्रिपुरा (1 गाडी), उत्तरप्रदेश (301 गाड्या), उत्तराखंड (4 गाड्या) आणि पश्चिम बंगाल (7 गाड्या) अशा विविध राज्यांमध्ये पोहोचून या 642 “श्रमिक विशेष” गाड्यांचा प्रवास संपुष्टात आला.
श्रमिक विशेष गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व प्रवाश्यांची व्यवस्थित तपासणी झाली आहे याची खात्री केल्यानंतरच त्यांना या गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. प्रवासादरम्यान या प्रवाश्यांना रेल्वे विभागाकडून मोफत भोजन आणि पाणी पुरविले जात आहे.
* * *
B.Gokhale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1623668)
Visitor Counter : 234
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam