सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
तंत्रज्ञान केंद्रांद्वारे आता अद्ययावत वेळेनुसार परिणाम वाचक सूक्ष्म पीसीआर प्रणालीच्या जटिल भागांची निर्मिती
हे यंत्र एका तासापेक्षा कमी वेळात देऊ शकते कोविड -19 चाचणी निकाल
Posted On:
11 MAY 2020 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2020
एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची भुवनेश्वर, जमशेदपूर आणि कोलकाता ही तंत्रज्ञान केंद्रे, आता विशाखापट्टणममधील एएमटीझेड अर्थात आंध्रप्रदेश वैद्यकीय उपकरणे उत्पादन करणाऱ्या पार्कसाठी अद्ययावत वेळेनुसार परिणाम वाचक सूक्ष्म पीसीआर प्रणालीच्या क्लिष्ट भागांची निर्मिती करीत आहेत. हे यंत्र 1 तासापेक्षा कमी कालावधीत कोविड 19 चाचणी निकाल देऊ शकते (सामान्य चाचणी परीक्षेस किमान 24 तास लागतात) आणि एका खासगी एमएसएमई संस्थेद्वारे त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही यंत्रे आकाराने लहान असून चाचणीसाठी कोठेही, कधीही, वेळेवर नेता येऊ शकतात. तंत्रज्ञान केंद्राचे पथक 600 चाचणी यंत्रांसाठीचे भाग पुरविण्यासाठी 2/3 शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. एएमटीझेडला 150 चाचणी यंत्राचे भाग पुरविले गेले आहेत. जगातील सर्वोत्तम यंत्रांवर 5 मायक्रॉनची अचूकता असलेले स्टेनलेस स्टीलचे भाग तयार केले जात आहेत.
हे कोरोना चाचणी यंत्र परवडणार्या किंमतीत चाचणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. भुवनेश्वर, जमशेदपूर आणि कोलकाता येथे असलेल्या एमएसएमई मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्रांच्या सक्रिय सहकार्याने आणि मदतीने यंत्राचे उत्पादन शक्य झाले.
दरवर्षी सुमारे 2 लाखांहून अधिक तरूण आणि उद्योग क्षेत्रातील कामगारांना व्यावहारिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात एमएसएमई मंत्रालयाने स्थापित केलेली तंत्रज्ञान केंद्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही 18 विद्यमान तंत्रज्ञान केंद्रे साधनांची रचना व निर्मिती, अचूक भाग,साचे, फोर्जिंग आणि फाउंड्री, इलेक्ट्रॉनिक्स, विद्युत मोजमाप यंत्र, सुगंध आणि चव, काच, पादत्राणे आणि क्रीडा वस्तू इत्यादीद्वारे उद्योगांना तांत्रिक आधार प्रदान करतात. जटिल साधने, भाग आणि घटकांसाठी रचना, विकास आणि उत्पादन यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना मदत करण्याबरोबरच संरक्षण, एरोस्पेस सारख्या मोक्याच्या क्षेत्रांना त्यांच्या संशोधन आणि विकासाच्या आवश्यकतांसाठी यातील काही तंत्रज्ञान केंद्रांनी सहकार्य केले आहे.
सध्याच्या कोविड संकटात वैद्यकीय उपकरणे, पीपीई, मास्क, सॅनिटायझर इत्यादींच्या निर्मितीत सहकार्य करण्यासाठी तंत्रज्ञान केंद्रे कार्यरत आहेत.
एमएसएमई तंत्रज्ञान केंद्रांची उद्दीष्टे:
. यंत्रांची साधने आणि साचे बनविण्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासहित असलेल्या अभ्यासक्रमात (आणि इतर संबंधित अभियांत्रिकी व्यवसाय) नव्याने प्रवेश घेणाऱ्या आणि आधीपासून असलेल्या तरुण कर्मचार्यांना दीर्घकालीन आणि अल्प-मुदतीचे प्रशिक्षण देणे.
. एमएसएमई विभागांची उत्पादकता सुधारण्याच्या उद्देशाने टूल इंजीनियरिंगच्या क्षेत्रात प्रामुख्याने एमएसएमई विभागांना सल्लागार सेवा प्रदान करणे.
. यंत्रांच्या निर्मितीतील अचूकतेसाठी / औष्णिक उपचार आणि इतर तांत्रिक अभियांत्रिकीमधील माहितीसाठी देशातील एमएसएमईला सामान्य सुविधा सेवा प्रदान करणे. उच्च अचूक गुणवत्तेचे साचे, साधने यांची रचना करून त्यांचे उत्पादन करणे.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1623136)
Visitor Counter : 246