गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
देहरादून स्मार्ट सिटीने कोविड–19 चा सामना करण्यासाठी एकात्मिक सूचना आणि नियंत्रण कक्ष, सीसीटिव्ही आणि लॉकडाऊन पास यासह केल्या उपाययोजना
Posted On:
11 MAY 2020 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2020
कोविड – 19 च्या विरोधात लढा देण्यासाठी स्मार्ट सिटी लिमिटेडने (डीएससीएल) देखरेख आणि पाळत ठेवण्यासाठी एकात्मिक सूचना आणि नियंत्रण कक्षाचा वापर केला आहे. कोविड-19 रोखण्याच्या गरजेनुसार डीएससीएलचे संबंधित अधिकारी जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने नियोजन आणि व्यवस्थापन करीत आहेत. तंत्रज्ञान भागीदार असलेले एचपीई, एसजीएल आणि वेबलाईन हे दूरस्थपणे डीएससीएल आणि जिल्हा प्रशासनाद्वारे व्हिडिओ आणि टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत. ते अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत आहेत.
एकात्मिक सूचना आणि नियंत्रण कक्ष
देहरादून एकात्मिक सूचना आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून देहरादून स्मार्ट सिटी लिमिटेडने रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षात देखरेख पद्धत सुरू केली आहे. डीएससीएलने आगोदरच दून, कोरोनेशन, गांधी शताब्दी, शुभार्ती रुग्णालय आणि ताकजीन हॉटेल येथे सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर करून दररोज 24 तास सुरक्षा पुरविण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आणि त्याचा एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आधारित चेहरा ओळखणारा व्हिडिओ विलगीकरण/अलगीकरण कक्षात संग्रहित केला जाईल.
सेवा देणाऱ्यांबरोबरच विलगीकरण करण्यात आलेले लोक सुरक्षित आणि निर्धोक आहेत, हे समजण्यासाठी सीसीटिव्ही बसविणे हे आणखी एक पाऊल आहे.
अत्यावश्यक सेवा लॉकडाऊन पास
देहरादून स्मार्ट सिटीने ``एसेन्शिअल सर्व्हिस लॉकडाऊन पास `` या नावाने एक कॉम्प्युटर अप्लिकेशन विकसित केले आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवांचा वापर करायचा असेल तर त्यांनी या पाससाठी अर्ज करावा, मान्यता मिळवावी आणि त्यानंतर घर सोडावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा पातळी / शहर पातळीवरील अपातकालीन / अत्यावश्यक सेवा, इंधन, वैद्यकीय सेवा, अन्न पुरवठा आणि धान्य सेवा, घरपोच सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि दूरभाष सेवा इत्यादीसाठी.
|
|
Essential Service Lock Down Pass
|
जनजागृती मोहिमा
लॉकडाऊन आणि महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा आणि सर्व सरकारी सेवांबाबतची माहिती देण्यासंदर्भात देहरादून स्मार्ट सिटी जनजागृती निर्माण करीत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअप ग्रुप सारख्या समाज माध्यमांच्याद्वारे डीएससीएलच्या जनजागृती पसरविण्याच्या उपक्रमांबाबत हे शहर नागरिकांना प्रेरणा देत आहेत.
शहरामधील चिंताजनक ठिकाणांमध्ये बसविलेल्या व्हेरिएबल मेसेजिंग डिस्प्लेज् (व्हीएमडी) च्या द्वारे कोविड – 19 बाबत जनजागृतीपर संदेश प्रकाशित केला जात आहे. व्हिएमडीवर पोलिस, आरोग्य, अन्य महत्वाच्या विभागांचे तसेच अत्यावश्यक सेवा विभागांचे दूरध्वनी क्रमांक देखील प्रदर्शित केले जात आहेत.
G.Chippalkatti/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1622975)
Visitor Counter : 248