संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या वैयक्तिक संरक्षण उपकरणाला (पीपीई) आयएनएमअएस (न्युक्लीयर औषधे आणि संबद्ध विज्ञान संस्था) द्वारे प्रमाणपत्र
Posted On:
07 MAY 2020 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2020
भारतीय नौदलाने आरेखन आणि उत्पादित केलेल्या वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांची (पीपीई) तपासणी डीआरडीओ ची संस्था असणाऱ्या आयएनएमएएस(न्युक्लीयर औषधे आणि संबद्ध विज्ञान संस्था), दिल्ली यांनी केली आहे, डीआरडीओ पीपीई ची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याचे काम करते आणि त्यांनी या पीपीई सूटच्या मोठ्याप्रमाणात उत्पादन आणि क्लिनिकल कोविड-19 परिस्थितीतील वापरासाठी प्रमाणपत्र जारी केले आहे.
सध्या सुरु असलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात वैयक्तिक संरक्षण उपकरणांची (पीपीई) कमतरता ही गंभीर चिंतेचा विषय आहे कारण त्यांची कमतरता आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुरक्षा आणि मनोधैर्यावर विपरीत परिणाम करतो. पीपीई उत्पादनाला
चाचणीसंबंधीच्या कठोर निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीची मानके आयसीएमआर आणि एमओएचएफडब्ल्यूने निश्चित केली आहेत.
कोविड विरूद्धच्या लढाईतील ही महत्त्वपूर्ण साधने उपलब्ध करून देण्याचे आव्हान भारतीय नौदलाने स्वीकारले. इनोव्हेशन सेल, नेव्हल मेडिसिन इन्स्टिट्यूट, मुंबई आणि नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांनी बनविलेल्या पथकाने पीपीई आरेखन आणि उत्पादन करण्यासाठी सहकार्य केले. डीआरडीओची संस्था असणाऱ्या आयएनएमएएस, दिल्ली यांनी पीपीई ची तपासणी केली आहे, डीआरडीओ पीपीईची तपसणी आणि प्रमाणपत्र देण्याचे काम करते.
या उत्पादनाने पीपीई 6/6 कृत्रिम रक्त भेदन प्रतिकार चांचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. (भारत सरकारने ISO 16603 मानकांनुसार किमान 3/6 आणि वरील पातळी बंधनकारक केली आहे) आणि म्हणूनच याच्या मोठ्या प्रमाणत उत्पादनाला आणि क्लिनिकल स्तरावर कोविड-19 परिस्थितीत याच्या वापराला प्रमाणित केले आहे.
साधे, नाविन्यपूर्ण आणि कमी-खर्चिक आरेखन हे या पीपीईची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत; आणि म्हणूनच हे प्राथमिक उत्पादन सुविधांच्या आधारे तयार केले जाऊ शकते. पीपीई साठी वापरण्यात आलेल्या कापडाच्या नाविन्यपूर्ण निवडीसाठी पीपीई उल्लेखनीय आहे, या पीपीई श्वासोच्छवास क्षमता आणि प्रवेशासाठी प्रतिरोध प्रदान करतात आणि वापरकर्त्यासाठी आरामदायक आणि सुरक्षित आहे.
या पीपीई ची किंमत व्यावसायिक दृष्ट्या उपलब्ध असलेल्या पीपीई पेक्षा कमी आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621972)
Visitor Counter : 186