सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
गडकरी यांनी फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर्स असोसिएशन ऑफ इंडियाला देशांतर्गत उत्पादन आणि आयात पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्याचे केले आवाहन
देशात बांबूचे उत्पादन वाढवण्याच्या गरजेवर गडकरी यांनी दिला भर
Posted On:
06 MAY 2020 10:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2020
केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या चर्चेदरम्यान सदस्यांनी कोविड-19 साथीमुळे एमएसएमई समोर असलेल्या विविध आव्हानांबाबत काही सूचना केल्या तसेच चिंता व्यक्त केली आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून सहकार्याची विनंती केली.
गडकरी यांनी सुगंध आणि स्वाद उद्योगाला आयात उत्पादनांचा वापर करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली आणि बांबूच्या देशांतर्गत उत्पादनावर भर दिला. ते म्हणाले कि या उद्योगाने जागतिक बाजारात प्रतिस्पर्धी बनण्यासाठी अभिनवता, तंत्रज्ञान आणि संशोधन या कौशल्यांवर अधिक लक्ष द्यायला हवे.
अधोरेखित करण्यात आलेले काही प्रमुख मुद्दे आणि केलेल्या सूचनांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत- कच्च्या मालावरील उच्च आयात शुल्क आणि तयार वस्तूंवर कमी आयात शुल्क, ईशान्येकडील प्रदेशातील वीज आणि वाहतुकीच्या समस्या, कामगारांना वेतन देणे, वित्तपुरवठा मजबूत करणे, क्रियाशील भांडवलाचा मुद्दा, तरलता प्रदान करण्यासाठी प्राप्तिकर परतावा प्रक्रिया वेगवान करणे
गडकरी यांनी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि सरकारकडून सर्व शक्य त्या मदतीची ग्वाही दिली. त्यांनी संबंधित विभागांकडे या समस्या उपस्थित करणार असल्याची माहिती दिली.
* * *
M.Jaitly/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621751)
Visitor Counter : 177