आयुष मंत्रालय

कोविड- 19 परिस्थितीत आयुष उपचार प्रणाली संदर्भातील तीन आंतरज्ञानशाखीय अभ्यासांचे औपचारिक उद्‌घाटन

Posted On: 06 MAY 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6  मे 2020

कोविड- 19 च्या परिस्थिती संदर्भातील  आयुष उपचार प्रणाली वर आधारित तीन अभ्यास आयुष मंत्री श्री श्रीपाद येस्सू नाईक आणि आरोग्यमंत्री श्री हर्ष वर्धन यांच्या हस्ते संयुक्तरित्या उद्या नवी दिल्ली येथे सुरू होणार आहेत.

देशातील कोविड-19 साथीच्या आजारावरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  आयुष मंत्रालयाने आयुष यंत्रणेच्या क्लिनिकल स्टडीजच्या माध्यमातून (रोगप्रतिबंधक औषध आणि त्याबाबतचे हस्तक्षेप) हा पुढाकार घेतला आहे. कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी आयुष आधारित रोगप्रतिबंधक औषधांचा मोठ्या लोकसंख्येवर होणारा परिणामआयुष सल्लागार आणि उपाय यांचा मंत्रालय अभ्यास करीत आहे.

आयुष मंत्रालयाने या उपक्रमाची रणनिती तयार करणे आणि ती विकसित करणे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली अंतरज्ञानशाखीय विषय म्हणून आयुष संशोधन आणि विकास कृतीदलाची स्थापना केली आहे, ज्यामध्ये तज्ज्ञांच्या गटाचा समावेश आहे.

खालील अभ्यासक्रमांचे औपचारिक उद्‌घाटन 7 मे 2020 रोजी होईल :

  1. रोगप्रतिबंधक म्हणून आणि कोविड- 19 बाबत सर्वसाधारणपणे घेण्याची प्रमाणित काळजी म्हणून आयुर्वेद हस्तक्षेपांवर प्रयोगशालेय संशोधन अभ्यास 

आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय हे संयुक्तपणे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या माध्यमातून आयसीएमआरच्या तांत्रिक मदतीने प्रयोगशालीय अभ्यास केला जाणार आहे.

अंतःविषय आयुष संशोधन आणि विकास कृतीसमितीने कोविड-19 च्या पॉझिटिव्ह केसेसमधून आढावा घेऊन आणि देशभरातील विविध संस्थांमधील उच्चपदस्थ तज्ज्ञांशी जे अश्वगंधा, यष्टीमधू, गुडूची + पिंपळी आणि संमिश्र औषधी अशा चार वेगवेगळी सूत्रे (आयुष – 64) असलेल्या हस्तक्षेपांचा अभ्यास करीत आहेत, अशांशी सल्लामसलत प्रक्रिया पार पाडून  रोगप्रतिबंधक औषधांचा अभ्यास आणि त्याबाबतचे हस्तक्षेप यांच्यासाठी काही संकेतांचा आराखडा तयार केला आहे.

अ.  कोविड 19 साथीच्या दरम्यान जास्तीची जोखीम असलेल्या विषयांमध्ये सार्स – कोव्ह – 2 च्या विरुद्ध रोगप्रतिबंधक औषध म्हणून अश्वगंधा : आरोग्य सेवा प्रदात्यांमधील हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणखी एक अन्य औषधी घटक यातील तुलना.

ब.   कोविड – 19 वरील सौम्य ते मध्यम उपचारांसाठी उपचारांचे मानक म्हणून आयुर्वेदीय सूत्रांच्या परिणामकारकतेचे वैशिष्ट्य : यादृच्छिकरण, खुला वर्ग, समांतर कार्यक्षमता, सक्रीय नियंत्रण, बहु केंद्र औषध अन्वेषण चाचणी.

2. आयुष आधारित रोगप्रतिबंध औषधांच्या प्रभावावर लोकसंख्या आधारित मध्यवर्ती अभ्यास : कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी मोठा धोका असलेल्या लोकसंख्येतील आयुर्वेदिक हस्तक्षेपांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आयुष मंत्रालय लोकसंख्या आधारित अभ्यास सुरू करीत आहे. कोविड 19 साठी आयुष हस्तक्षेपाच्या प्रतिबंधात्मक संभाव्यतेचे मूल्यांकन करणे आणि मोठी जोखीम असणाऱ्या जनसंख्येच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत होणाऱ्या सुधारणेचे मूल्यांकन करणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत. आयुष मंत्रालयांतर्गत चार संशोधन परिषदांच्या माध्यमातून आणि देशभरातील 25 राज्यांमधील राष्ट्रीय संस्था आणि अंदाजे पाच लाख लोकसंख्या असलेल्या अनेक राज्य सरकारांच्या कक्षेत हा अभ्यास केला जाईल.

कोविड 19 सारख्या महामारी दरम्यान आयुष हस्तक्षेपाची प्रतिबंधात्मक क्षमता वैज्ञानिक पुराव्यांद्वारे समजून घेण्यासाठी या अभ्यासाचा निकाल हा निश्चितच एक नवे क्षितिज निर्माण करेल.

3.कोविड 19 ला प्रतिबंध करण्यासाठी आयुष सल्लागारांच्या भूमिकेची स्वीकृती आणि त्याच्या वापरासंबंधी प्रभावी मूल्यांकनासाठी आयुष संजीवनी अप्लिकेशनद्वारे अभ्यास :  पन्नास लाख सारख्या मोठ्या लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुष संजीवनी मोबाईल अपलिकेशन तयार केले आहे. मूळ अपेक्षित निकालांमध्ये स्वीकृतीवरील माहिती समाविष्ट करणे आणि आयुष सल्लागारांचा सहभाग आणि लोकसंख्येबाबतचे उपाय आणि कोविड 19 च्या प्रतिबंधात त्याचा परिणाम नोंदविणे. 

 

G.Chippalkatti/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621618) Visitor Counter : 266