आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
तंबाखुजन्य उत्पादनांच्या पाकिटांवर आरोग्यविषयक चेतावणी इशारा देण्यासाठी नवीन निर्देश
Posted On:
04 MAY 2020 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2020
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने तंबाखुजन्य उत्पादनाच्या पाकिटांवर आरोग्यविषयक वैधानिक चेतावणी इशारा देण्यासाठी नवीन निर्देश निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी सिगरेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादनाच्या (पॅकिंग आणि लेबलिंग) नियमामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यानुसार 2008च्या नियमांमध्ये जीएसआर 248 (ई) मध्ये दि. 13 एप्रिल, 2020 अनुसार बदल करण्यात येणार आहेत. या बदलानुसार दि. 1 सप्टेंबर, 2020 पासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.
नवीन नियमांनुसार उत्पादनांच्या पाकिटांवर चेतावणी इशारा देण्याविषयीचा तपशील पुढील प्रमाणे असेल -
अ. छायाचित्र -1 - दि.1 सप्टेंबर,2020 पासून 12महिन्यांसाठी अशी (नवी) प्रतिमा वैध असेल.
Image- 1
|
|
|
ब. छायाचित्र -2 - प्रतिमा -1ची वैधता संपुष्टात आल्यानंतर हे छायाचित्र छापून सिगरेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादनाच्या पाकिटांवर चेतावणीचा वैधानिक इशारा दिला जाणार आहे.
Image- 2
|
|
|
या अधिसूचनेमध्ये पाकिटावर चेतावणीचे छायाचित्र किती लांबी - रूंदीचे असावे, तसेच चेतावणी, इशारा याविषयी सर्व माहिती www.mohfw.gov.in आणि www.ntcp.nhp.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर देण्यात आली आहे. तसेच 19 भाषांमध्ये पाकिटावर छापण्यासाठी इशारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नवीन केलेल्या नियमानुसार अधिक माहिती अशी की -
- सर्व तंबाखूजन्य उत्पादकांनी दि.1 सप्टेंबर, 2020 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या किंवा आयात केलेल्या मालाच्या पाकिटांवर छायाचित्र-1 प्रदर्शित करायचे आहे. आणि त्यानंतर 12 महिन्यांनी म्हणजे 1 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या किंवा आयात केलेल्या तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटांवर छायाचित्र-2 मधील प्रतिमा प्रदर्शित करायची आहे.
- सिगारेट आणि कोणत्याही तंबाखूजन्य उत्पादनाची निर्मिती करणारे, पुरवठादार, आयात करणारे किंवा या मालाच्या वितरकांनी नवीन निर्दिष्ट केलेल्या नियमांनुसार पॅकिंग केले जात आहे की नाही, आणि निश्चित केलेल्या नियमानुसार वैधानिक आरोग्य चेतावणी दिली जात आहे की नाही, हे तपासावे.
- या नियमांचे उल्लंघन करणा-या संबंधितांवर दंडात्मक गुन्हा नोंदवून तुरूंगवास आणि दंडाची शिक्षा देण्याची तरतूद कलम 20- सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादन (व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांच्यावरील निर्बंध) कायदा, 2003 मध्ये आहे.
- या उत्पादनांच्याबाबतीत ‘‘पॅकेज’’च्या व्याख्येमध्ये अधिनियम आणि त्यातल्या नियमांच्या अनुसार सुधारणा करण्यात आली आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620922)
Visitor Counter : 329