संरक्षण मंत्रालय

आघाडीच्या योद्ध्यांनी कोरोना योद्ध्यांना केले अभिवादन आणि या लढ्यात सहकार्य सुरु ठेवण्याचे दिले आश्वासन

Posted On: 01 MAY 2020 10:52PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 मे 2020

 

  दिल्लीत आज  माध्यमांना संबोधित करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे, नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली आणि आगामी काळात आघाडीच्या योद्धयांकडून त्यांना पाठिंबा सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा केली. पत्रकार परिषदेची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे –
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले की 24 मार्च  2020 ते  03 मे 2020 या कालावधीत प्रत्येक भारतीयाकडून  उल्लेखनीय बलिदानाची अपेक्षा करण्यात आली. लॉकडाउनच्या आवाहनाची  बहुतेक भारतीयांनी दखल घेतली आणि  घरून काम केले. मात्र काही थोडे भारतीय असे आहेत जे  'कोरोना वॉरियर्स'  बनून आपला जीव धोक्यात घालून वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधा सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी , रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी , मूलभूत खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी , कोणत्याही रूग्ण उपचाराशिवाय परत जाऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन तसेच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणून त्यांची काळजी घेण्यासाठी झटत आहेत. हे कोरोना योद्धे डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, पोलिस कर्मचारी किंवा माध्यमामधील कर्मचारी असतील,  त्यांनी कोरोनाविरोधातील भारताचा लढा  सुरु राहील याकडे लक्ष दिले. आम्ही या योद्ध्यांना आणि त्यांच्या प्रयत्नांना सलाम करतो आणि त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. कोविड -१९ शी लढा देण्यात त्यांचे बलिदान आणि प्रयत्नांप्रति आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना सामोरे जावे लागत असलेल्या धोक्यांची आम्हाला कल्पना आहे.
संरक्षण दल प्रमुख पुढे म्हणाले की साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी भारत सरकारच्या अथक प्रयत्नांना सहाय्य करताना  सर्व नागरिकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करताना प्रशंसनीय संयम दाखवला आणि देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या मार्गावर आहे आणि जागतिक स्तरावर बहुतांश देशांपेक्षा उत्तम कामगिरी सुनिश्चित केली आहे. 
         संरक्षण दल प्रमुखानी आश्वासन दिले की सशस्त्र दल कोव्हीड -19 विरोधात दोन तत्वांनुसार लढा देत आहेत: सक्तीचे संरक्षण आणि नागरी अधिकाऱ्यांना सहाय्य. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आघाडीवरील एकही सैनिक, नाविक किंवा हवाई दलातील जवान बाधित झालेला नाही आणि सशस्त्र दल सर्व आव्हानांसाठी पूर्णपणे सज्ज आहे. हवाई दल प्रमुखांनी  एका प्रश्नाला उत्तर देताना याची पुष्टी केली की कोविडचे एकही  प्रकरण दलात आढळलेले नाही आणि संरक्षण कायम ठेवले आहे.
संरक्षण दल प्रमुख  पुढे म्हणाले की कोरोना वॉरियर्सना अग्रेसर सैनिकांचा भक्कम पाठिंबा दर्शविण्यासाठी 03 मे 20 रोजी सशस्त्र दल  काही उपक्रम हाती घेणार आहे.  रविवारी, सशस्त्र दल लढाऊ  विमानांद्वारे फ्लाय पास्ट सारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणार असून श्रीनगर ते तिरुवंतपुरम, आणि दिब्रुगढहून कच्छ पर्यंत हवाई दलाची विमाने वाहतूक करतील. आयएएफ आणि आयएनचे हेलिकॉप्टर्स कोविड रूग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतील.  कोरेना योद्धयांचे आभार व्यक्त करण्यासाठी नौदल आणि आयसीजी समुद्री  जहाजांना निवडक ठिकाणी हलवतील तर सैन्य बॅन्ड कोविड रुग्णालयाला भेट देतील आणि रुग्णालयाबाहेर विविध धून वाजवतील.
पोलिस कर्मचारी यांच्या योगदानाविषयी बोलताना संरक्षण दल प्रमुखांनी सर्वांचे आभार मानताना म्हणाले की त्यांनी  अपवादात्मक आणि  शौर्यपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नाचा गौरव करण्यासाठी, तिन्ही सेवादलाचे प्रमुख 3 मे 2020 रोजी सकाळी पोलिस स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करतील.  परिषद संपण्यापूर्वी त्यांनी  पुन्हा डॉक्टर,परिचारिका ,  इतर आरोग्य कर्मचारी, स्वच्छता  कर्मचारी, पोलीस आणि माध्यम कर्मचारी  अशा सर्व कोरोना योद्धयांचे आणि सर्व भारतीयांचे या अभूतपूर्व लढाईत उल्लेखनीय प्रयत्नांसाठी आभार मानले.

 

M.Jaitly/S.Kane/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1620308) Visitor Counter : 259