गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्मार्ट शहर कल्याण-डोंबिवलीचा कोविड -19 डॅशबोर्ड आता नागरिकांसाठी खुला


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोरोनासंबंधित माहिती एका क्लिकवर

Posted On: 29 APR 2020 3:34PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 एप्रिल 2020

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रातील कोविड 19 च्या सद्यस्थितीची माहिती  नागरिकांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मनपाची माहिती देणारा डॅश बोर्ड विकसित करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह सोशल मीडिया हँडल (जसे की फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) शी जोडलेले असुन  सर्वाना  पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली.

सदर डॅशबोर्ड ला भेट देण्यासाठी https://kdmc-coronavirus-response-skdcl.hub.arcgis.com/ क्लिक करावे.  ‘डॅशबोर्ड’ चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ड्रॉप मेनूचा उपयोग करून नागरिकांना कोणत्याही मतदार प्रभाग व त्यातील संबंधित ग्राफमध्ये कोविड परिस्थितीची स्थिती जाणून घेता येईल. शहराच्या स्थानिक नकाशावर संबंधित प्रभागांवर क्लिक करून नागरिकांनाही माहिती  मिळू शकते.  डॅशबोर्ड उपग्रह दृश्य, रस्ता नकाशा इत्यादी पर्यायांमधून पार्श्वभूमी बेस नकाशा बदलून नकाशे पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

नागरिकांनी अचुक व अधिकृत माहितीसाठी या डँशबोर्डचा वापर करावा. अफवा अथवा अर्धवट माहितीवर  विश्वास ठेवु नये. कोरोना ‍विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने मनपा प्रशासन प्रभावी  उपाययोजना  करीत आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुर्यवंशी  यांनी  केले आहे.

डॅशबोर्ड पाहण्यासाठी https://kdmc-coronavirus-response-skdcl.hub.arcgis.com/ यावर क्लिक करा.

डॅशबोर्ड’ चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ड्रॉप मेनूचा वापर करून नागरिकांना कोणत्याही मतदार प्रभागातील कोविड परिस्थितीची माहिती संबंधित नकाशांद्वारे जाणून घेता येईल. शहराच्या स्थानिक नकाशावर संबंधित प्रभागांवर क्लिक करून नागरिकांना सद्यस्थिती समजू शकते. सॅटेलाईट व्ह्यू, रोड मॅप   इत्यादी पर्यायांद्वारे आधीच्या मूळ नकाशात बदल करून नकाशे पाहण्यासाठी, डॅशबोर्ड बहुविध पर्याय प्रदान करतो.

 

कोविड प्रकरणांचा केडीएमसी शहर-स्तरीय तपशील

प्रभागनिहाय वर्गवारीसह शहर पातळीवरील केडीएमसीमधील कोविड प्रकरणे

केडीएमसीमधील कोविड प्रभावित प्रभाग

केडीएमसीमधील कोविड प्रकरणांचा तारीखवार तपशील

केडीएमसीमधील कोविड प्रकरणांचा प्रभागनिहाय तपशील

M.Jaitly/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619225) Visitor Counter : 287