आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
अँटीबॉडीजच्या जलद चाचण्यांच्या मूल्याविषयीच्या विवादासंबंधी वस्तुस्थिती
Posted On:
27 APR 2020 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2020
सर्वप्रथम, ICMR म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने खरेदीचे निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतले, ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोविड-19 चा सामना करण्यासाठी, तपासण्या हे अतिमहत्त्वाचे साधन असून, त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी ICMR शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. यासाठी तपासणी किट्सची खरेदी व राज्यांना पुरवठा करणे गरजेचे ठरते. त्याचवेळी, जागतिक स्तरावर या किट्ससाठीची मागणी प्रचंड वाढली असून सर्वच देश ती मिळविण्यासाठी आपली सर्व आर्थिक ताकद व मुत्सद्देगिरी पणाला लावून प्रयत्न करीत आहेत.
या किट्सची मागणी ICMR ने पहिल्यांदा केली तेव्हा पुरवठादारांकडून काहीही प्रतिसाद आला नाही. दुसऱ्या प्रयत्नाला मात्र पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यापैकी, सर्व बाजूंनी विचार करता, दोन कंपन्यांच्या (बायोमेडीमिकस व वोन्डफो) किट्सची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी आवश्यक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणन या दोन्हींकडे होते.
वोन्डफोसाठी, मूल्यमापन समितीकडे चार बोली आल्या आणि त्यांत रु.1,204, रु. 1,200, रु. 844 व रु. 600 अशा बोली लावण्यात आल्या होत्या. त्यानुसार रु.600 या किमतीला L-1 मानण्यात आले.
दरम्यान, ICMR ने ही किट्स चीनमधील वोन्डफो कंपनीतून CGI मार्फत थेट मिळविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, थेट खरेदीसाठी सांगण्यात आलेल्या किमतीत पुढील अडचणी होत्या-
- फ्री ऑन बोर्ड (FOB) पद्धतीने ही किंमत सांगितलेली होती- म्हणजेच ठराविक पद्धतीने वाहतूक केल्यास वाहतूक खर्च न लागता विक्री किमतीतच किट्स मिळणार होती. मात्र, वाहतुकीतील अडचणींबाबत यात कोणतीही वचनबद्धता स्वीकारण्यात आलेली नव्हती.
- कोणत्याही हमीशिवाय मात्र 100 टक्के थेट आगाऊ रक्कम मिळण्याच्या अटीवर ही किंमत सांगण्यात आलेली होती.
- वेळेबाबत कोणत्याही वचनबध्दतांचा उल्लेख नव्हता.
- अमेरिकी डॉलरमध्ये दर सांगण्यात आले होते, मात्र त्यात त्याच्या मूल्यातील चढ-उताराबद्दलचे कलम नव्हते.
त्यामुळे वोन्डफोच्या भारतासाठीच्या वितरकाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला गेला. त्या वितरकाने FOB साठी आगाऊ रकमेच्या कलमाशिवाय सर्वसमावेशक अशी किंमत सांगितली.
ही किट्स खरेदी करण्यासाठी एका भारतीय संस्थेकडून झालेला हा पहिलाच प्रयत्न होता, व केवळ लिलावात बोलल्या गेलेल्या दरांचाच आधार यासाठी उपलब्ध होता, याची नोंद घेतली गेली पाहिजे.
काही प्रमाणात पुरवठा झाल्यानंतर ICMR ने पुन्हा एकदा या किट्सच्या गुणवत्तेच्या चाचण्या प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीत घेतल्या. त्यांच्या कामगिरीचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यमापन करून वोन्डफोची आणि दुसरीही ऑर्डर (मागणी), गुणवत्तेच्या कारणावरून रद्द करण्यात आली आहे.
येथे आणखी एक मुद्दा अधोरेखित केला जात आहे, की ICMR ने या पुरवठयांसंबंधाने कोणतीही रक्कम दिलेली नव्हती. योग्य प्रक्रिया अनुसरून काम केल्याने (100 टक्के आगाऊ रक्कम भरून खरेदी न केल्याने) भारत सरकारचा एकही रुपया वाया गेलेला नाही.
G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618702)
Visitor Counter : 290
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam