शिक्षण मंत्रालय
ई लर्निंग करिता मजकूर योगदान देण्यासाठी "विद्यादान 2.0 " या राष्ट्रीय कार्यक्रमाचा केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ
Posted On:
22 APR 2020 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020
ई लर्निंग करिता मजकूर योगदानासाठी विद्यादान 2.0 या राष्ट्रीय कार्यक्रमाचा केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज नवी दिल्लीत ई प्रारंभ केला. केंद्रीय मनुष्य बळ विकास राज्य मंत्री संजय धोत्रे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी (शालेय आणि उच्च शिक्षण) ई लर्निंग सामग्रीसाठीची वाढती आवश्यकता आणि शालेय शिक्षण आणि डिजिटल शिक्षण एकीकृत करण्याच्या तातडीच्या गरजेमुळे हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
(DIKSHA) दीक्षा हा केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाचा मंच सप्टेंबर 2017 पासून 30 हून अधिक राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये अध्ययन आणि अध्यापन वृद्धिंगत करण्यासाठी दीक्षाचे संचलन करत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा शालेय आणि उच्च शिक्षणावर वेगवेगळ्या पद्धतीने मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत उपयोगकर्त्या सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी दीक्षा या मंचावर ई लर्निंग सामग्री दृढ करण्याची ही योग्य वेळ आणि संधी आहे.
दीक्षाची व्यापकता आणि क्षमता लक्षात घेऊन अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी दीक्षाच्या डिजिटल संसाधनात योगदान देण्यात रुची दर्शवली आहे.दीक्षा आढावा बैठकीत तज्ञ शिक्षक, व्यक्ती आणि संघटनांनी, विद्यादान अंतर्गत उच्च गुणवत्ता सामग्री प्राप्त करण्यासाठी क्राउडसोर्सिंग टूल चा वापर करण्यावर भर दिला आहे.
देशभरातल्या व्यक्ती आणि संघटना यांच्यासाठी सामायिक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून निर्माण केला असून त्याद्वारे निरंतर गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी शालेय आणि उच्च शिक्षणासाठी ई लर्निग संसाधनांचे योगदान दिले जाते. देशभरातल्या लाखो मुलांना केव्हाही आणि कुठेही शिक्षण सुरु ठेवण्यासाठी या ऐपवरची माहिती उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.
विषय स्पष्ट करणारे व्हिडिओ, सादरीकरण, प्रश्न मंजुषा यासारखा वेगवेगळ्या प्रकारचा आशय देऊन योगदान देण्यासाठी विद्यादानला आशय योगदान टूलआहे असे पोखरीयाल यांनी सांगितले. पहिली ते बारावी पर्यंत राज्यांनी निर्देशित केलेल्या कोणत्याही विषयावर योगदान देण्यासाठी या टूल मधे संरचित इंटरफेस प्रदान करण्यात आले आहे.
शिक्षण तज्ञ, संबंधित विषयातले तज्ञ,शाळा, विद्यापीठे, संस्था, सरकारी आणि बिगर सरकारी संस्था आणि व्यक्ती यासाठी योगदान देऊ शकतात. या मंचावरच्या ई लर्निंग मजकुरात समाविष्ट करण्यासाठी ज्यांच्या आशयाला संमती मिळाली आहे त्यांच्यासाठी ही अभिमानाची बाब असेल असे पोखरीयाल यांनी सांगितले. विद्यादान कार्यक्रम लवकरच शिक्षक प्रशिक्षण साहित्यासाठी योगदान आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यादान मार्फत योगदान देण्यासाठीच्या प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://vdn.diksha.gov.in/ किंवा https://diksha.gov.in/ ला भेट देऊन विद्यादानवर क्लिक करा.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617249)