गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

'संयम मोबाईल ॲप’ द्वारे पुण्यातील विलगीकरण केलेल्या रूग्णांवर ठेवले जाणार लक्ष

Posted On: 21 APR 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  एप्रिल 2020

स्मार्ट शहर योजनेअंतर्गत(smart cities mission SCM) पुणे महानगरपालिकेने संयम नावाचे मोबाईल ॲप बनवले असून त्याद्वारे विलगीकरण केलेले रुग्ण घरातच रहात आहेत अथवा घराबाहेर पडत नाहीत, याची खातरजमा केली जाणार आहे. पुणे शहर व्यवस्थापनाने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शहरातील घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर निगराणी ठेवणे सुरु केले आहे. त्यासाठी शहरात घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी  पाच विभागांमधून समर्पितपणे काम करणाऱ्या लोकांची पथके तयार केली आहेत. ही पथके परदेशातून प्रवास करून आलेल्या, तसेच कोविड-19 चे उपचार पूर्ण करून घरी पाठवलेल्या रूग्णांवर लक्ष ठेवतील. ही पथके या लोकांच्या तब्येतीची अद्ययावत माहिती मिळवतील तसेच त्या रूग्णांच्या सहवासात आलेल्या लोकांची देखील चौकशी करतील.घरगुती विलगीकरण केलेल्या, ज्यांच्यावर शिक्का मारला आहे, असे लोक आपले अन्न ,बिछाने,भांडी, कपडे आणि स्वच्छतागृहे वेगळी ठेवत आहेत किंवा नाही, याचीही खातरजमा करतील.

संयम मोबाईल ॲप अशा लोकांनी डाऊनलोड केले आहे का,हे देखील पहातील.या मोबाईल ॲपमधे GPS ट्रँकींग बसवले असून घरगुती विलगीकरण केलेले लोक घराबाहेर पडतात का ते कळेल, त्यायोगे शहर आस्थापनेला त्याची माहिती मिळून विभागातील स्थानिक पोलिसांना त्याची वर्दी मिळेल.

घरातच विलगीकरण केलेल्या नागरिकांवर निगराणी ठेवणाऱ्या डॅशबोर्डचे चित्र खाली दिले आहे:

घरातच विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या हालचालींवर निरंतर निगराणी ठेवली जाते. त्याचे चित्र खाली दिले आहे:

सर्व घरगुती विलगीकरण केलेल्या नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करण्याचे आदेश दिले आहेत.या नागरिकांनी त्यांच्या घरगुती विलगीकरणाच्या काळात  आपले मोबाईल 24 तास सुरू ठेवायचे असून त्यातील GPS ट्रँकर देखील सतत सुरु ठेवायचे आहेत.या नागरीकांच्या सर्व हालचालींवर एका मध्यवर्ती पध्दतीने लक्ष ठेवले जाणार असून त्यांना लाल,पिवळा अथवा हिरवा रंग दिला आहे. लाल रंग म्हणजे ती व्यक्ती बाहेर आहे, पिवळा म्हणजे मर्यादेत आहे तर हिरवा रंग म्हणजे घरातच आहे, हे रंगाद्वारे निश्चित होईल.

 

U.Ujgare/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1616766) Visitor Counter : 286