नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
सोलर पीव्ही मॉड्यूल आणि सोलर पीव्ही सेल्स उत्पादकांच्या मंजूर यादीच्या अंमलबजावणीसाठी एमएनआरईने सहा महिन्यांनी म्हणजे 30-09-2020 पर्यंत मुदत वाढविली
Posted On:
21 APR 2020 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2020
देशभर पसरलेल्या कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने (एमएनआरई) सौर पीव्ही मॉड्यूल आणि सौर पीव्ही सेल्ससाठीच्या मान्यताप्राप्त मॉडेल्स आणि उत्पादक (एएलएमएम) यांच्या याद्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी तारखांची मुदत 30-9-2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे, ती पूर्वी 31-03-2020 पर्यंत होती.
देशात ऊर्जा सुरक्षितता निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि सोलर पीव्ही सेल आणि मॉड्यूलची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी, नवीन व नूतनूकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) 02-01-2019 रोजी सोलर पीव्ही सेल्स आणि मॉड्यूल्ससाठी मान्यताप्राप्त मॉडेल्स आणि उत्पादक (एएलएमएम) यांच्यासंदर्भात आदेश जारी केला होता. या आदेशानुसार, बीआयएस मानकांची अंमलबजावणी करून सोलार पीव्ही सेल्स आणि मॉड्यूल्स बनविणाऱ्या मॉडेल आणि उत्पादक यांची नोंदणी एएलएमएम यादी -1 (सोलार पीव्ही मॉड्यूल्ससाठी) आणि एएलएमएम यादी – 2 (सोलार पीव्ही सेल्ससाठी) मध्ये केली जाते. या यंत्रणेनुसार, यादी – 1 नुसार सोलार पीव्ही मॉड्यूल्ससाठी आणि यादी - 2 नुसार सोलार पीव्ही सेल्ससाठीचे मॉडेल्स आणि उत्पादक निर्दिष्ट केले जातात.
एएलएमएम आदेशानुसार प्रभावी तारखेनंतर, सर्व सौर पीव्ही ऊर्जा प्रकल्प जे सरकारच्या मालकीचे / शासकीय सहाय्य असलेले / केंद्र सरकारच्या मानक निविदा मार्गदर्शक तत्वांनुसार निविदा प्रदर्शित झालेल्या, अशा प्रकल्पांसाठी सोलार पीव्ही सेल्स आणि मॉड्यूल्स हे प्रभावी तारखेनंतर एएलएमएम यादीतील मान्यताप्राप्त उत्पादकांकडून खरेदी करणे अनिवार्य असेल.
एमएनआरई सातत्याने सर्व संबंधित प्रतिनिधींना (केंद्र व राज्य सरकारच्या) स्पष्टपणे निर्देश देत आहे की, एएलएमएम याद्या मंजूर झाल्यानंतर, या यादीनुसारच सोलर पीव्ही सेल्स आणि मॉड्यूलची खरेदी झाली पाहिजे, असे स्पष्ट कलम निविदा पत्रकांमध्ये समाविष्ट करून घ्यावे.
एमएनआरई पुन्हा निर्देशित करीत आहे की, सोलर पीव्ही सेल्स आणि मॉड्यूल्स उत्पादक, नूतनीकरणयोग्य ऊर्जा (आरई) विकासक, अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि आरई ऊर्जा प्राप्तकर्ते, आणि सर्वात महत्त्वाचे आरई क्षेत्राला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँक आणि वित्तीय संस्था यासह सर्व भागधारकांनी मान्यताप्राप्त सोलार पीव्ही मॉड्यूल्स आणि सेल्सच्या मॉडेल्स आणि उत्पादक यांच्या मान्यताप्राप्त यादीसंदर्भातील दिनांक 02-01-2019 च्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
G.Chippalkatti/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1616758)
Visitor Counter : 237