पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

प्रविष्टि तिथि: 20 APR 2020 3:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलिह यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव आणि त्यावर सुरु असलेल्या उपाययोजनांची एकमेकांना माहिती दिली.

कोविडचा सामना करण्यासाठी सार्क देशांदरम्यान  समन्वयाने प्रयत्न करण्याबद्दल जी सहमती झाली होती, त्यानुसार अंमलबजावणी होत असल्याबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

मालदीव येथे पाठवण्यात आलेले डॉक्टरांचे पथक आणि आवश्यक ती औषधे मालदीवला या संकटातून बाहेर काढण्यात महत्वाचे योगदान देत आहेत, याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी संतोष व्यक्त केला आहे. मालदीवसारख्या पर्यटनावर मुख्यत्वे अवलंबून असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर या आजारामुळे आलेले संकट अत्यंत आव्हानात्मक आहे, हे लक्षात घेत, मालदीवमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  भारत सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी सोलीह यांना दिले.

या आजारामुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी दोन्ही देशातील अधिकारी एकमेकांच्या सातत्याने संपर्कात राहतील आणि इतर सर्व बाबतीत सहकार्य करतील, यावर या चर्चेत सहमती झाली.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1616346) आगंतुक पटल : 281
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam