शिक्षण मंत्रालय

फिट इंडिया आणि सीबीएससी यांच्या वतीने लाँकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात, प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी शारीरिक व्यायामाची प्रात्यक्षिके,आयुष मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर


उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून शालेय विद्यार्थ्यांना ही  प्रात्यक्षिक सत्रे फिट इंडिया आणि सीबीएससी यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम हँन्डलवरून, पाहता येणार

Posted On: 14 APR 2020 7:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या फिट इंडिया अँक्टिव्ह डे प्रोग्रॅममधील व्यायामाच्या प्रात्यक्षिकांना  मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर या चळवळीद्वारे सुदृढ रहाण्यासाठी नव्या फिटनेस कार्यक्रमाच्या मालिकेची सुरुवात फिट इंडिया चळवळीद्वारे करण्यात आली आहे. यावेळी हा कार्यक्रम सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने सुरू होत आहे. या कार्यक्रमाद्वारे, शालेय मुलांना, निरोगी रहाण्यासाठी ,आयुष मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे ही जाहीर केली आहेत.

"केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने फिट इंडिया चळवळीला सुरवातीपासूनच  सहकार्य देऊ केले आहे.  ११ हजार सहाशे ब्याऐंशी शाळा फिट इंडिया चळवळीत सामील झाल्या आहेत.या अशा उपक्रमांमुळे शालेय विद्यार्थ्यांना केवळ लाँकडाऊनच्या काळातच व्यग्र   राहून फायदा होईल असे नाही, तर शारिरीक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैली राखण्याबाबत कायम स्वरुपी प्रेरणा मिळेल आणि हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या मागचा दृष्टीकोन आहे," असे मत, या प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाची सुरुवात करतानामनुष्यबळ मंत्री श्री.रमेश पोखरीयाल नि:शंक यांनी व्यक्त केले.

केंद्रीय युवाकल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांच्या मते आँनलाईन शिक्षण पध्दत ही काळाची गरज आहे.

"मुले घरातच असून, सध्या त्यांच्या शारिरीक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. शारिरीक शिक्षण तज्ञांच्या या प्रात्यक्षिकांमुळे मुलांना घरच्या घरी खात्रीपूर्वक, सुदृढ रहाण्यास मदत होईल.सध्याच्या काळात, प्रत्येकाने ,विशेषतः मुलांनी, शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त रहाणे आणि रोगप्रतिबंधकशक्ती वाढवणे गरजेचे आहे.यावेळी व्यायामाच्या प्रात्यक्षिकांसोबतच, सोप्या युक्तिंनी, रोगप्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी करण्याच्या उपायांबाबतही आयुष मंत्रालयाद्वारे मार्गदर्शन केले जाईल.या प्रात्यक्षिकांचा मुलांना आणि त्यांच्या पालकांना देखील भरपूर फायदा होईल, असा मला विश्वास आहे,"असं केंद्रीय युवाकल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रिजीजू यावेळी म्हणाले.

कोविड-19च्या या महामारीच्या वेळी 3 मे 2020 पर्यंतच्या लाँकडाऊन कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिलेल्या तंदुरुस्त रहाण्याच्या आणि रोगप्रतिबंधक शक्ति वाढवण्याच्या आवाहनानुसार 'फिट इंडिया चळवळ' आणि 'सीबीएससी 'ने शालेय विद्यार्थांच्या तंदुरुस्तीसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. व्यायामाच्या प्रात्यक्षिकांसोबतच आयुष मंत्रालय शालेय विद्यार्थ्यांना रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्याच्या, तसेच निरोगी रहाण्याच्या, उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करेल.

दिनांक 15 एप्रिल 2020 पासून सकाळी 9:30 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना, फिट इंडिया चळवळ आणि सीबीएससीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या हँन्डलवरून ही प्रात्यक्षिके पहाता येणार आहेत.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार यू ट्यूबवर देखील ही प्रात्यक्षिके पहाता येतील.

हा प्रात्यक्षिकांमधून मुलांसाठी  विविध व्यायाम प्रकार, योगासने यांसह पोषणयुक्त आहार, तसेच मानसिक स्वास्थ्य या विषयांबाबत  देखील मार्गदर्शन केले जाईल.सुप्रसिद्ध व्यायामतज्ञ आलिया ईम्रान,पोषणतज्ञ पूजा माखिजा,मानसिक स्वास्थ तज्ञ डॉ. जितेंद्र नागपाल,योगतज्ञ हिना भीमानी,यांच्या सह इतर अनेक तज्ञ या  कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

CBSC ची सामाजिक हँडल माध्यमे, GOQii,  Shilpa Shetty App,   या हँन्डल्सवरूनही ही प्रात्यक्षिके पाहता येतील.

 

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor



(Release ID: 1614454) Visitor Counter : 180