कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रिय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे निवेदन
Posted On:
14 APR 2020 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे 20.3.2020 नंतर नवी दिल्ली येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि त्याच्या देशभरातील शाखांमध्ये कामकाज शक्य झाले नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधांचा अभाव आणि त्यांची खरेदी करण्यात येणारे अडथळे यामुळे न्यायधिकरणाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही शक्य होऊ शकले नाही. 14.04.2020 नंतर भारत सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर आधारित या परिस्थितीचा आढावा घेण्याचे नियोजन होते.
आज, माननीय पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधून केलेल्या त्यांच्या भाषणात लॉकडाऊन येत्या 03.05.2020 पर्यंत वाढविला असल्याचा निर्णय घोषित केला, हा निर्णय 20.04.2020 रोजी संबंधित क्षेत्र आणि हॉटस्पॉट यांचा आढावा घेऊन त्यावर अवलंबून असेल, असे घोषित केले. त्यामुळे कामकाजाची सद्यस्थिती.04.2020 पर्यंत कायम ठेवावी लागेल आणि 20.04.2020 रोजी होणाऱ्या घोषणेनुसार न्यायाधिकरणाच्या कामकाजाच्या व्यवहार्यतेवर विचार केला जाईल.
न्यायाधिकरणाच्या विविध खंडपीठांची सुट्टी वेगवेगळ्या कालावधीत आहे. एर्नाकुलम खंडपीठासाठी ती एप्रिलच्या मध्यात सुरू होईल आणि त्यानंतरच्या काही आठवड्यांपासून बंगळुरू खंडपीठाची सुट्टी सुरू होईल. अशाच टप्प्याने उत्तरेपर्यंतच्या खंडपीठांचे सुट्ट्यांचे नियोजन असेल आणि प्रमुख खंडपीठाची सुट्टी जून 2020 मध्ये असेल. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खंडपीठाचे कामकाज न झाल्यामुळे झालेल्या कामकाजाच्या नुकसानीची भरपाई कशी केली जाऊ शकते, याबाबतचा निर्णय खंडपीठाचे कामकाज सुरू झाल्यानंतर संबंधित बार असोसिएशनशी सल्लामसलत करून घेतला जाईल.
तातडीच्या सुनावणीसाठी कोणत्याही खंडपीठापुढे एखादा विनंती अर्ज वकिलांकडून आल्यास, मुख्य निबंधकांना ते कळविण्यात येईल जे त्यातील प्राधान्यतेनुसार आवश्यक त्या सूचना देतील आणि त्याबाबत आवश्यकतेनुसार कामकाजात लक्ष घालतील.
प्रमुख खंडपीठ आणि अन्य खंडपीठे त्यांच्या किमान आवश्यक कर्मचाऱ्यांसह अशा पद्धतीने काम करतील की जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोणत्याही धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. खंडपीठाच्या मुख्य निबंधकांनी अशा कर्मचाऱ्यांची निवड करावी आणि त्यांना आलटून पालटून काम सोपवावे. प्रशासनाकडील तातडीचे प्रश्न ऑनलाइन पद्धतीने सोडविता येतील किंवा दूरध्वनीवरून संभाषणाद्वारे चर्चा करून, सल्ला-मसलत करून निकाली काढता येतील.
U.Ujgare/S.Shaikh/P.Kor
(Release ID: 1614410)