संरक्षण मंत्रालय

बीआरओने धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा श्रीनगर-लेह महामार्ग चार महिन्यांनंतर केला खुला

Posted On: 12 APR 2020 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) लडाखला उर्वरित जगाशी जोडणारा धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा श्रीनगर-लेह महामार्ग शनिवारी खुला केला. झोजीला खिंडीतून सुरुवातीला सुमारे 18 तेलाचे टँकर आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला लेह /लडाखच्या दिशेने जाण्याची परवानगी देण्यात आली. झोजिला खिंडीत नव्याने बर्फवृष्टी होऊनही हे शक्य करण्यात आले.

झोजिला खिंडीत मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाल्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबरपासून हा 425 किलोमीटर लांबीचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. लडाखच्या विभागीय आयुक्तांच्या  निर्देशानुसार , लडाख या केंद्रशासित प्रदेशात जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध करून देण्याची तातडीची गरज निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन प्रोजेक्ट बीकन आणि प्रोजेक्ट विजयक यांच्या टीमने झोजिलाच्या आसपास 11,500 फूट उंचीवर साठलेला नवीन बर्फ दूर केला आणि रस्ता वाहतूक करण्या योग्य केला.

यावर्षी झालेल्या हिमवृष्टीने मागील सहा दशकातील विक्रम मोडले आहेत. बीआरओच्या प्रोजेक्ट बीकन अंतर्गत गगनगीर ते झिरो पॉईंट दरम्यान बर्फ हटवण्याचे काम हाती घेण्यात आले होते तर प्रोजेक्ट विजयक अंतर्गत द्रास ते झिरो पॉईंट या मार्गावरचा बर्फ हटवण्यात आला.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1613553) Visitor Counter : 106