राष्ट्रपती कार्यालय

इस्टरनिमित्त राष्ट्रपतींचा संदेश

प्रविष्टि तिथि: 11 APR 2020 7:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

इस्टरच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संदेश दिला आहे.

''इस्टरच्या पवित्र सणानिमित्त मी सर्व नागरिकांना विशेषतः भारतातील आणि परदेशातील ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देतो.

असे मानले जाते की याच दिवशी येशू ख्रिस्तांचे  पुनरावतरण झाले. या शुभ घटनेच्या आनंदाप्रीत्यर्थ इस्टर साजरा केला जातो. ख्रिश्चचनांसाठी अत्यंत पवित्र असलेला हा सण लोकांना प्रेम, त्याग आणि क्षमेचा मार्ग अनुसरण्याची प्रेरणा देतो. येशू ख्रिस्तांच्या  शिकवणुकीतून प्रेरणा घेऊया आणि संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करूया.

या सणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये एकतेची भावना अधिक दृढ होउदे आणि आपले राष्ट्र तसेच समाजाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आपण सगळे प्रतिबद्ध होऊन पुढे वाटचाल करत राहू.  कोविड-19 मुळे उद्भवलेल्या या संकटाच्या क्षणी   सामाजिक अंतर आणि इतर सरकारी निर्देशांचे पालन करत हा पवित्र उत्सव घरातच राहून कुटुंबासह साजरा करण्याचा संकल्प करूया.''

****

B.Gokhale/S.Kakde/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1613422) आगंतुक पटल : 116
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam