कृषी मंत्रालय
लॉकडाउन निर्बंधांवर मात करीत उन्हाळी पिकांची पेरणी अविरत सुरू
तांदूळ लागवडीखालील क्षेत्रात 8.77% वाढ झाल्याने उन्हाळी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात 11.64% पर्यंत वाढ
Posted On:
11 APR 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020
कोविड -19 महामारी आणि त्या पार्श्वभूमीवर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या अडचणींनंतरही उन्हाळी पिकांची पेरणी समाधानकारकपणे झाली आहे. विशेषतः 25 मार्च 2020 पासून सुरु झालेल्या लॉकडाउन काळात असलेली बंधने आणि सामाजिक अंतराचे नियम असतानाही त्या परिस्थितीवर मात करीत; 10 एप्रिल 2020 रोजी कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या संकलित आकडेवारीनुसार उन्हाळी पिकाखालील एकूण (तांदूळ, डाळी, भरडधान्य आणि तेल बियाण्यांसह) लागवडीखालील क्षेत्र वाढले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.64% वाढ नोंदली गेली आहे. सन 2018--19 मध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्र 37.12 लाख हेक्टर होते तर 2019 - 20 मध्ये 48.76 लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच आठवड्यात 10 एप्रिल रोजी 41.81 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते.
उन्हाळी पिकांपैकी, लागवडीखालील क्षेत्राच्या या वाढीचे मुख्य पीक हे तांदूळ आहे, ज्याच्या पेरणी क्षेत्रात 8.77% वाढीचे प्रमाण आहे. इतर सर्व पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रामध्ये 1% पेक्षा कमी वाढ झाली आहे. नाचणीसारखी भरडधान्य वगळता मागील वर्षीच्या तुलनेत 0.06% किरकोळ घट नोंदली गेली आहे. गतवर्षीच्या याच कालावधीत 23.81 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदुळाचे पीक होते जे यावर्षीच्या उन्हाळ्यात वाढून 32.58 लाख हेक्टर झाले आहे. मुख्यतः पश्चिम बंगालमध्ये (11.25 लाख हेक्टर), तेलंगणात (7.45 लाख हेक्टर), ओडिशात (3.13 लाख हेक्टर), आसाममध्ये (2.73 लाख हेक्टर), कर्नाटकमध्ये (1 64 लाख हेक्टर), छत्तीसगडमध्ये (1.50लाख हेक्टर), तामिळनाडूत (1.30 लाख हेक्टर), बिहारमध्ये (1.22 लाख हेक्टर), महाराष्ट्रात (0.65 लाख हेक्टर), मध्य प्रदेशमध्ये (0.59 लाख हेक्टर), गुजरातमध्ये (0 54 लाख हेक्टर) आणि केरळमध्ये (0.46 लाख हेक्टर) क्षेत्र तांदुळाखाली नोंदविण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या याच कालावधीत 3.01 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी सुमारे 3.97 लाख हेक्टर क्षेत्र डाळींखाली नोंदविण्यात आले आहे. प्रामुख्याने तामिळनाडूत (1 46 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (0 73 लाख हेक्टर), पश्चिम बंगाल (0 59 लाख हेक्टर), गुजरात (0.51लाख हेक्टर), छत्तीसगड (0 24 लाख हेक्टर), बिहार (0.18 लाख हेक्टर) कर्नाटक (0 08 लाख हेक्टर), पंजाब (0 05 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.04 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0.03 लाख हेक्टर), झारखंड (0.03 लाख हेक्टर), तेलंगणा (0 02 लाख हेक्टर) आणि उत्तराखंड ( 0.01 लाख हेक्टर).क्षेत्र डाळींखाली नोंदविण्यात आले आहे.
मागील वर्षातील याच कालावधीत 4.33 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी भरडधान्यांचे 5..54 लाख हेक्टर क्षेत्रफळ नोंदविण्यात आले. यात मुख्यतः गुजरात (2.27 लाख हेक्टर), पश्चिम बंगाल (1.21 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0 .63 लाख हेक्टर), बिहार (0.41 लाख हेक्टर), कर्नाटक (0.39 लाख हेक्टर), छत्तीसगड (0 29 लाख हेक्टर), तामिळनाडू (0 26 लाख हेक्टर), मध्य प्रदेश (0 08 लाख हेक्टर) आणि झारखंड (0.01 लाख हेक्टर) क्षेत्र भरडधान्याखाली नोंदविण्यात आले आहे.
तेलबियांमध्ये मागील वर्षीच्या याच कालावधीत 5.97 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी सुमारे 6..66 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मुख्यत्वे पश्चिम बंगाल (1.33 लाख हेक्टर), कर्नाटक (1.30 लाख हेक्टर), गुजरात (1.09 लाख हेक्टर), ओडिशा (0.62 लाख हेक्टर), महाराष्ट्र (0.58 लाख हेक्टर), तामिळनाडू (0.53 लाख हेक्टर) आंध्र प्रदेश (0.41 लाख हेक्टर), उत्तर प्रदेश (0.28 लाख हेक्टर), तेलंगणा (0.21 लाख हेक्टर), छत्तीसगड (0.18 लाख हेक्टर), हरियाणा (0.06 लाख हेक्टर), पंजाब (0.04 लाख हेक्टर), बिहार ( 0.03 लाख हेक्टर) आणि मध्य प्रदेश (0.02 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली आहे.
उन्हाळ्यातील पिकांच्या लागवड क्षेत्रातील वाढीच्या सारणीसाठी येथे क्लिक करा.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1613413)
Visitor Counter : 236