संरक्षण मंत्रालय
उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील आयुध निर्माण प्रकल्पांमध्ये कोविड-19 च्या लढाईसाठी वापरण्यात येणा-या तंबूंच्या कापडाच्या चाचणीस मान्यता
Posted On:
11 APR 2020 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020
संपूर्ण देशभर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा विचार करून सरकारच्या सर्व विभागांकडून कोविड-19 च्या विरुद्ध सुरू झालेल्या लढाईसाठी आपआपल्या क्षमतेनुसार सर्वतोपरी मदत केली जात आहे. अशाच पद्धतीने संरक्षण मंत्रालयाच्या आयुध निर्माण कारखान्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे, तंबू तयार केले जात आहेत. या विशिष्ट प्रकारच्या उत्पादनाच्या गुणवत्ता तपासणीचे काम आयुध निर्माण मंडळाचे दोन कारखाने करणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या कानपूरच्या स्मॉल आर्म्स फॅक्टरी (एसएएफ) आणि तामिळनाडूतल्या अवादी इथल्या हेवी व्हेइकल फॅक्टरी (एचव्हीएफ) या कारखान्यांनी कोविड-19 साठी वापरण्यात येणा-या वैद्यकीय साधनांची गुणवत्ता तपासण्यास ‘एनएबीएल’ने म्हणजेच राष्ट्रीय चाचणी आणि प्रमाणन मान्यता मंडळाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या सामुग्रीची निर्मिती या दोन्ही कारखान्यांनी अतिशय कमी वेळेत म्हणजेच अवघ्या पंधरवड्यात केली आहे. तसेच ही साधने एएसटीएम एफ1670 : 2003 आणि आयएसओ 16603: 2004 च्या प्रमाणित दर्जानुसार आहेत.
या चाचणीचे मूलभूत तत्व म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी भिन्न तापमानाच्या आणि वेगवेगळ्या हवेच्या दाबावर टिकून राहण्यासाठी जे सिंथेटिक कापड तयार केले जाते ते टिकले पाहिजे, ते फाटून चालणार नाही. असे कापड मजबूत आणि टिकावू असण्याची गरज आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. या सर्वांना सर्व प्रकारच्या हवामानात सुरक्षित ठेवू शकणा-या आच्छादनाचे तंबू उभारण्याची गरज आहे.
आत्तापर्यंत अशा प्रकारच्या कापडाची चाचणी ही देशात फक्त कोइंबतूर इथल्या दक्षिण भारत वस्त्र संशोधन संघटना (सिट्रा) या संस्थेमध्ये केले जात होती. आता संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे इतक्या तातडीने सिट्राकडून परीक्षण होवू शकणार नाही. या परीक्षणाची आवश्यकताही तितकीच आहे.
कोरोनाग्रस्तांसाठी हव्या असलेल्या साधन सामुग्रींची कमतरता पडू नये, हे लक्षात घेवून आता दक्षिण भारतामध्ये आणखी एक चाचणी सुविधा केंद्र तयार केले आहे तसेच उत्तर भारतामध्ये पहिलेच चाचणी केद्र स्थापन करण्यात आले आहे.
या सुविधेमुळे आयुध निर्माण कारखान्यांमध्ये तंबूंच्या आच्छादनासाठी लागणारे कापड तयार होईल. त्याचबरोबर चार उत्तर प्रदेशातल्या आणि एका तामिळनाडूमधल्या कारखान्यांमध्ये त्यांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात येणार आहे.
U.Ujgare/S.Bedekar/P.Kor
(Release ID: 1613406)
Visitor Counter : 225