रेल्वे मंत्रालय

लॉकडाउनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी हेल्पलाईन, समाजमाध्यम आणि ईमेलद्वारे 2,05,000 पेक्षा जास्त विचारणांना दिला प्रतिसाद

Posted On: 11 APR 2020 4:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

रेल्वे प्रवाशांना, इतर नागरिकांना मदत करण्यासाठी आणि मालवाहतुकीच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर भारतीय रेल्वेने हेल्पलाईन सुविधा दिल्या आहेत. हेल्पलाईन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ही सुविधा रेल्वे व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरली आहे. पहिल्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी हेल्पलाईन आणि इतर संपर्क व्यासपीठावरील 2,05,000 पेक्षा जास्त विचारणांना प्रतिसाद दिला आहे, त्यातील 90% म्हणजे (सुमारे 1,85,000) पेक्षा जास्त प्रश्नांना थेट संवादातून उत्तरे देण्यात आली.

रेल्वे नियंत्रण कार्यालय हे हेल्पलाईन - 139, 138 , समाज माध्यम  (ईएसपी ट्विटर) आणि ईमेल (railmadad@rb.railnet.gov.in) या चार संप्रेषण आणि अभिप्राय मंचाद्वारे सातही दिवस24 तास   देखरेख करीत आहे. याद्वारे लॉकडाऊन दरम्यान रेल्वे प्रशासन आणि सामान्य लोक यांच्यात माहिती आणि सूचनांची सतत देवाण घेवाण होत आहे. संचालक-स्तरावरील अधिका-यांनी चोवीस तास हेल्पलाइन सेवा कार्यरत ठेवली असून विभागीय रेल्वे व्यवस्थापक स्तरावरील क्षेत्रीय अधिकारी त्यावर देखरेख ठेवत आहेत.

लॉकडाऊनच्या पहिल्या दोन आठवड्यात रेल्वे मदत हेल्पलाइन 139 वरून 1,40,000 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत, त्याव्यतिरिक्त त्याच्या आयव्हीआरएस (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) सुविधेद्वारे उत्तरे दिली आहेत. बहुतेक प्रश्न हे रेल्वे सेवा पुन्हा कधी सुरु होणार याविषयी आणि  परताव्याच्या नियमांविषयी होते. (जे लोकांच्या अभिप्रायांवर आधारित होते), या कठीण काळात रेल्वेच्या प्रयत्नांचे कौतुक समाजमाध्यमांद्वारे होत आहे. त्यात जीवनावश्यक  वस्तू घेऊन जाण्यासाठी  मालवाहतूक गाड्या चालवणे, वॅगन्स निघायला विलंब झाला तरी  दंड माफ करणे, डब्यांचे रुग्णालय कक्षात रूपांतरण करणे, खाद्यपदार्थांची पाकिटे वितरित करणे, कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीपीई,सॅनिटायझर्स आणि इतर उपकरणे तयार करणे यासह इतर काही गोष्टींचा समावेश आहे.          

हेल्पलाईन 138 वर आलेले कॉल हे जिओ फेन्स्ड असतात म्हणजे फोन करणाऱ्याच्या ठिकाणानुसार  जवळच्या रेल्वे विभागीय नियंत्रण कार्यालयात (स्थानिक भाषेत प्रवीण व स्थानिक प्रश्नांशी परिचित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत असलेल्या) कॉल जोडला जातो जेणेकरून कॉल करणाऱ्यांना  सोयीस्कर असलेल्या भाषेत माहिती आणि मार्गदर्शन मिळू शकेल. ही नवीन प्रणाली भाषेच्या अडथळ्यांवर मात करते आणि रेल्वे ग्राहक आणि इतरांना जलदरीत्या माहिती देण्याचे काम करते  कारण संबंधित माहिती विभागाकडे सहज उपलब्ध आहे.

प्रवाशांचे आणि सर्व व्यावसायिक ग्राहकांचे हित जपण्यासाठी आणि राष्ट्रीय पुरवठा साखळी अव्याहत चालू ठेवण्यासाठी भारतीय रेल्वेने अहोरात्र मेहनत घेतली आहे.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Kor


(Release ID: 1613323) Visitor Counter : 222