पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा

प्रविष्टि तिथि: 10 APR 2020 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा  केली.

कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आरोग्य आणि आर्थिक आव्हानांबाबत तसेच या संकट काळात, दोन्ही नेत्यांनी, आपल्या देशाने उचललेल्या पावलांविषयी चर्चा केली.

सध्याच्या संकट काळात, या दोनही देशात परस्परांच्या नगरीकांना  मिळत असलेले सहाय्य आणि सुविधांबाबत प्रशंसा व्यक्त करत  हे सहकार्य असेच राखण्याला उभय नेत्यांनी  मान्यता दर्शवली.

या महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याकरिता  मार्ग दाखवण्यासाठी भारत-जपान भागीदारी,महत्वाची भूमिका बजावू शकेल  यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1612951) आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam