विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

‘एससीटीआयएमएसटी’च्या वैज्ञानिकांनी संक्रमित रूग्णांच्या स्त्रावांची आणि अपशिष्टांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी शोषक साधनाची केली निर्मिती


‘‘जंतुनाशक साहित्यांबरोबरच शोषक जेल संक्रमित श्वसन स्त्राव विरघळण्यापूर्वी वेगळे ठेवणे यामुळे शक्य होईल’’- डीएसटीचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा

Posted On: 09 APR 2020 11:33AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

‘एससीटीआयएमएसटी’ अर्थात श्री चित्र तिरूनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्था या भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्थेतील वैज्ञानिकांनी संक्रमित श्वसन स्त्रावांचे आणि शरीरातल्या इतर द्रव पदार्थांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी  उत्कृष्ट शोषक साधन विकसित केले आहे.

‘एससीटीआयएमएसटी’च्या जैववैद्यकीय तंत्रज्ञान विभागाच्या जैवसामुग्री विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे डॉ. मंजू एस. आणि डॉ. मनोज कामथ यांनी विकसित केलेल्या या साधनाचे नामकरण ‘चित्र ॲक्रिलोसॉर्ब सिक्रेशन सॉलिडिफिकेशन सिस्टिम’ असे करण्यात आले आहे. या साधनामुळे जी व्यक्ती संक्रमित आहे, त्या व्यक्तिच्या श्वसनातून जे द्राव बाहेर येतात तसेच शरीरातून जे इतर द्रव पदार्थ बाहेर टाकले जातात, त्यांच्यामुळे संक्रमणाचा प्रसार होवू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. या नव्याने विकसित केलेल्या साधनामुळे संक्रमित व्यक्ती बाहेर टाकत असलेल्या द्रव पदार्थांचे अतिशय वेगाने शोषण होते. आणि त्याचे घनरूप बनते  तसेच त्या अपशिष्टाचे निर्जुंतुकीकरण होते.

कोणत्याही संसर्गजन्य परिस्थितीमध्ये रुग्णांकडून होणाऱ्या संक्रमित स्त्रावांची सुरक्षित विल्हेवाट लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी जंतुनाशक साहित्यासह एक उत्कृष्ट शोषक जेल बनवण्याची गरज होती. या जेलमुळे रुग्णाने बाहेर टाकलेले अपशिष्ट इतर कशातही विरघळण्यापूर्वीच त्याचे विलगीकरण आणि त्याला घनरूप देणे शक्य होणार आहे. रुग्णाचे अपशिष्ट एकत्र करण्यासाठी वापरण्यात येणा-या साधनाचे निर्जंतुकीकरणही करता येते, अशी माहिती डीएसटीचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी दिली.

नव्याने विकसित केलेले हे साधन त्याच्या वजनापेक्षा 20 पट जास्त द्रवपदार्थाचे शोषण करू शकतो. निर्जतुकीकरणासाठी त्यामध्ये विघटनशील पदार्थ वापरण्यात आले आहेत. असे साधन दूषित द्रवपदार्थ जेलसारखे स्थिर करतील अपशिष्टांना घनरूप देतील. निर्जंतुकीकरणाचे काम यामध्ये होत असल्यामुळे उर्वरित सर्व सामान्य जैववैद्यकीय कचरा म्हणून त्याचे विघटन करणे शक्य होईल. या तंत्रज्ञानामुळे रुग्णालयातल्या कर्मचारी वर्गाला बाटल्या आणि मोठ्या कचरा पेट्या पुन्हा वापरण्यासाठी निर्जंतूक करणे आणि साफसफाई करण्याची गरज भासणार नाही. तसेच त्यांना संसर्गाचा असणारा धोकाही कमी होईल. संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे निर्माण होणा-या कच-याची, त्याच्या अपशिष्टाची विल्हेवाट लावणे अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.

या नवीन विकसित केलेल्या साधनांमध्ये सक्शन कॅनिस्टर्स, डिस्पोजेबल स्पिट थैल्या, ‘‘क्रिलोसॉर्ब’’ तंत्रज्ञानासह तयार केल्या आहेत. त्यांच्या आतमध्ये क्रिलोसॉर्बचे एक अस्तर घातले आहे. अॅक्रिलोसॉर्ब सक्शन कॅनिस्टर्स हे अतिदक्षता विभागातल्या रुग्णांसाठी किंवा साध्या वॉर्डमधल्या रुग्णांसाठीही वापरता येतील. या रुग्णांनी नेमके किती द्रव पदार्थ बाहेर टाकले, याची नोंदही ठेवता येईल. वापरल्यानंतर या थैल्या ‘सील’करता येतील. तपासणीनंतर टाकाऊ वस्तूंमध्ये जैववैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावताना त्या जाळून टाकणे शक्य होईल. श्वसनसंबंधी आजार झालेल्यांची थुंकी, लाळ घट्ट करणारे जेल आतून लावलेल्या क्रिलोसॉर्ब पिशव्या वापरल्या तर त्या नंतर जाळून टाकता येतील.

संक्रमित रुग्णांच्या अपशिष्टांची विल्हेवाट लावणे हे रुग्णालयांपुढे एक मोठे आव्हान असते. कोविड-19 सारख्या अतिसंक्रामक आजार झालेल्या रुग्णांच्या स्त्रावांचा मोठाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कच-याची विल्हेवाट लावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला जास्त धोका संभवतो.

सामान्यपणे अतिदक्षता विभागामधला कचरा हा सक्शन यंत्रांच्या मदतीने मोठ्या बाटल्या किंवा डब्यांमध्ये खेचला जातो. हे डबे नंतर रिकामे करून त्याना जाळून टाकले जाते. कच-यातल्या द्रवाची विल्हेवाट लावली जाते. मात्र यामध्ये निर्जंतुकीकरण केले जातेच असे नाही. या सर्व प्रक्रियेत पुन्हा प्रदूषण होण्याची शक्यता जास्त असते. महामारीच्या काळात अशी सुसज्ज यंत्रणा सर्व रुग्णालयांमध्ये असतेच असे नाही. अनेकदा तात्पुरत्या सोयी निर्माण केल्या जातात. अशा वेळी रुग्णांच्या अपशिष्टामुळे रोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी अशी अपशिष्ट शोषक साधने प्रभावी ठरू शकतात.

(अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा - स्वप्ना वामदेवन, संपर्क अधिकारी एससीआयएमएसटी मोबाईल - 9656815943 ईमेल & pro@sctimst.ac.in)

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1612456) Visitor Counter : 245