पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान आणि ओमानचे सुलतान यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

Posted On: 07 APR 2020 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज ओमानचे सुल्तान महामहीम हैथम बिन तारिक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

दोन्ही नेत्यांनी सध्या कोविड- 19 महामारीमुळे उद्भवलेल्या आरोग्य आणि आर्थिक आव्हानांवर आणि आपापल्या देशाकडून त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांबत चर्चा केली. दोन्ही देश संकटाशी सामना करण्यासाठी एकमेकांना शक्य ते सर्व सहकार्य करतील यावर त्यांनी सहमती दर्शवली.

महामहीम सुलतान यांनी पंतप्रधानांना सध्याच्या परिस्थितीत ओमानमधील भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल आश्वस्त केले. भारतातील ओमानी नागरिकांना भारत सरकारने अलिकडेच पुरवलेल्या मदतीबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

महामहीम  दिवंगत सुलतान कबूस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी पुन्हा शोक व्यक्त केला. सुलतान हैथम यांच्या कारकीर्दीसाठी आणि ओमानमधील लोकांच्या शांतता आणि समृद्धीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. भारत ओमानकडे विस्तारित शेजारधर्माचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहतो यावर  पंतप्रधानांनी भर दिला.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1612036) Visitor Counter : 156