संरक्षण मंत्रालय

संरक्षण सार्वजनिक एकक (DPSUs)  आणि ऑर्डनन्स कारखाना संचालक मंडळ यांची कोविड-19 विरोधी लढाईसाठीची पूर्वतयारी

Posted On: 05 APR 2020 10:38AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण सार्वजनिक उपक़म  (DPSUs)  आणि ऑर्डनन्स कारखाना संचालक मंडळ  (OFB)  यांची कोविड-19 विरोधी लढाईची पूर्वतयारी या प्रकारे -

 

वैद्यकीय सुविधा

देशाच्या सहा राज्यातील दहा रुग्णालयांमध्ये 280 विलगीकरण कक्ष उभारण्याची  ऑर्डनन्स फॅक्टरी संचालक मंडळाची (OFB) योजना आहे. जबलपूरचा  वेईकल कारखाना, पश्चिम बंगालमधील इशापुरचा धातू व स्टील कारखाना  तसेच कोसीपोरमधील पिस्तूल आणि उखळी तोफांचा कारखाना, महाराष्ट्रातील खडकी येथील दारुगोळा कारखानाउत्तर प्रदेशातल्या कानपूरचा ऑर्डनन्स, कमारिया मधील ऑर्डनन्स कारखानातामिळनाडूतल्या अवादी येथील अवजड वाहन कारखाना आणि तेलंगणातल्या मेदक इथली ऑर्डनन्स फॅक्टरी या   10 ठिकाणी या वैद्यकीय सोयी करण्यात येतील. बंगलोर चा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) 3 खाटांच्या अतिदक्षता कक्षासह 30 खाटांच्या विलगीकरण कक्षांची सोय आहे. याशिवाय 30 खोल्या असलेली वेगळी सुसज्ज इमारतही तयार आहे. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे 93 रुग्णांची सोय करता येईल.

अरुणाचल प्रदेश सरकारच्या विनंतीवरून अतिशय थोड्या कालावधीत मिळालेल्या पूर्वसुचनेवरुन ऑर्डनन्स कारखाना संचालक मंडळाने covid-19 च्या रुग्णांसाठी पन्नास विशेष तंबूंची निर्मिती करुन ते रुग्णालयात पाठवले आहेत.

 

सॅनिटायझर

ऑर्डनन्स फॅक्टरी संचालनाच्या कारखान्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटना, WHO  च्या निकषांनुसारच्या हँड सॅनिटायझरचे उत्पादन घेतले जाऊन त्यांचे विकसन केले जात आहे. एचएलएल लाईफकेअर लिमिटेड (एचएलएल), या भारत सरकारने मध्यवर्ती घाऊक खरेदीसाठी नेमलेल्या  मध्यवर्ती एजन्सीने त्यांच्याकडे 13,000 लीटरची मागणी केली आहे. तामिळनाडूतल्या अरुवनकुडूच्या विस्फोटक फॅक्टरीकडून 31 मार्च 2020 ला 1500 लीटर सॅनिटायझर पाठवण्यात आले आहे.  मध्यप्रदेशातील इटारसी आणि महाराष्ट्रातील भंडारा या दोन्ही ऑर्डनन्स फॅक्टरी घाऊक प्रमाणावरील उत्पादनासाठी सज्ज आहेत. दोन्ही कारखान्यांची मिळून एकूण उत्पादनक्षमता दर दिवशी 3000 लिटर सॅनिटायझर एवढी आहे. त्यानुसार देशातील सॅनिटायझरची मागणी दोन्ही कारखाने मिळून पूर्ण करु शकतील. 

 

संरक्षण साधने : संपूर्ण शरीर संरक्षक आणि मास्क.

कानपूर, शहाजहानपूर, हजरतपूर (फिरोजाबाद) आणि चेन्नई येथील ऑर्डनन्स कारखाने संपूर्ण शरीरासाठीचे संरक्षक आवरण आणि फक्त तोंड झाकण्यासाठीचे मास्क यांच्या उत्पादनात व्यग्र आहेत. फार थोड्या कालावधीत पूर्वसूचना मिळाली तरी ही उत्पादने घेता यावी यासाठी विशेष हिट सिलिंग मशीनची सोय त्यांनी केली आहे.

ग्वाल्हेरच्या संरक्षक संशोधन आणि विकास संस्थेला कारखाने संचालक मंडळाने केलेल्या  विनंतीवरून शरीरसंरक्षक आवरणाचे ग्वाल्हेरला परिक्षण झालेले नमुने घेतले आहेत. कोईम्बतूरच्या साऊथ इंडिया टेक्स्टाईल असोसिएशनमध्ये (SITARA) मास्कचे परिक्षण सुरू आहे. ऑर्डनन्स कारखाना संचालक मंडळ हे लवकरच  शरीर संरक्षक आवरणाचे दर आठवड्याला 5000 ते 6000 नग  एवढे उत्पादन सुरू करत आहे.  शरीर संरक्षक आवरण आणि मास्क याच्या कार्यक्षमतेचे परिक्षण  करणाऱ्या तीन मशीन्स विकसित झाल्या असून त्यांना SITARA ने परिक्षण मंजूरी दिली आहे. या सर्व तयारीचा उत्पादन आणि दर्जा राखण्यासाठी उपयोग होईल.

 

व्हेंटिलेटर्स

भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुढिल दोन महिन्यात 30000 व्हेंटिलेटर्सचे उत्पादन घेण्याची  विनंती केलीत्यानुसार   भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)ने या कामात सहभाग घेतला आहे. या व्हेटिलेटर्सची संरचना संरक्षक संशोधन आणि विकास संस्थेकडून देण्यात आली. ती  (BEL) चे सहयोगी म्हैसूरचे मे. स्कॅनरे यांनी सुधारीत केली आहे. मेदकच्या ऑर्डनन्स फॅक्टरीने हैद्राबादच्या विविध ठिकाणच्या रुग्णालयातील जीव संरक्षण प्रणाली (व्हेंटिलेटर्स)च्या दुरुस्तीची जबाबदारी स्विकारली आहे.

B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor



(Release ID: 1611319) Visitor Counter : 238