कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

पीएम-केअर्स निधीमध्ये सीएसओआयचे 25 लाख रुपयांचे योगदान

प्रविष्टि तिथि: 04 APR 2020 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020


सध्या संपूर्ण भारत कोरोना विषाणू महामारीच्या विरोधात लढत आहे. या लढाईचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. कोविड-19 विरुद्धची लढाई आपल्या सर्वांना जिंकायची आहे, असा दृढ निश्चय सर्वांचा आहे. यासाठी संपूर्ण देश पंतप्रधानांच्या बाजूने ठाम उभा आहे. या लढ्यासाठी आर्थिक मदत म्हणून सिव्हील सर्व्हिसेस ऑफिसर्स इंस्टिट्यूट (सीएसओआय)च्यावतीने पीएम-केअर्स म्हणजेच ‘आपत्कालीन परिस्थिती पंतप्रधान सुरक्षा सहाय्य निधी’साठी 25 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. मंत्रिमंडळाचे सचिव आणि सीएसओआयचे अध्यक्ष राजीव गअुबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी जमा करण्यात आला. कोरोना महामारीने बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी या निधीचा विनियोग होवू शकणार आहे. 

 

 

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

  


 


(रिलीज़ आईडी: 1611209) आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada