रेल्वे मंत्रालय

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर ऊर्जा, वाहतूक आणि मूलभूत पायाभूत क्षेत्रांसाठी पुरवठा साखळी पूर्णपणे कार्यरत असल्याची भारतीय रेल्वेने दिली ग्वाही

प्रविष्टि तिथि: 04 APR 2020 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020


कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन काळातही ऊर्जा, वाहतूक आणि मूलभूत पायाभूत क्षेत्रांच्या गरजा भागविण्यासाठी भारतीय रेल्वे ही तिच्या मालवाहतूक सेवेद्वारे महत्वाचा कच्चा माल तसेच इंधन उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे पालन करीत आहे. 

लॉकडाऊनच्या परिस्थिती दरम्यान, या महत्त्वाच्या क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी विविध गोदामे, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांवर तैनात असलेले भारतीय रेल्वे कर्मचारी पूर्ण निष्ठेने कार्यरत आहेत.

रेल्वेच्या निरंतर सेवेमुळेच कोविड-19 च्या लॉकडाऊन काळातही ऊर्जा प्रकल्प आणि पेट्रोलियम डेपोमध्ये इंधनाचा पुरेसा साठा आहे.

23 मार्च ते 3 एप्रिल 2020 या शेवटच्या 12 दिवसांत रेल्वेने कोळशाच्या250020 वॅगन आणि पेट्रोलियम पदार्थांच्या 17742 वॅगन भरून मालवाहतूक केली आहे. (एका वॅगनमध्ये 58-60 टन माल असतो)

मालवाहतुकीचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

ऊर्जा, वाहतूक, पायाभूत सुविधा तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी विनाखंडीत इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयात आपत्कालीन मालवाहतूक नियंत्रण केंद्र कार्यरत आहे.

मालवाहतुकीवर वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष असते.

मालाची चढ-उतार करताना यापूर्वी रेल्वेला विविध स्थानकांवर भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल परिणामकारकरीत्या करण्यात आली आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्यासाठी भारतीय रेल्वे  ही गृह मंत्रालयासह, राज्य सरकारांशी समन्वय राखून आहे.

 

 

U.Ujgare/V.Joshi/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1611135) आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada