पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अधिकारप्राप्त गटांची बैठक


कोविड-19 चा मुकाबला करण्यासंदर्भातल्या तयारीचा घेतला देशव्यापी आढावा

प्रविष्टि तिथि: 04 APR 2020 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020

 

देशात कोविड-19 प्रतिसाद कृतीबाबत, नियोजन आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या अधिकार प्राप्त गटांची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, देशातल्या रुग्णालयांची उपलब्धता, योग्य विलगीकरण व्यवस्था, रोगासंदर्भात देखरेख व्यवस्था, निदान, देखभाल प्रशिक्षण याबाबत देशव्यापी आढावा घेतल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे. पीपीई, मास्क, ग्लोव्ह, व्हेंटीलेटर यासारख्या आवश्यक वैद्यकीय साधनांचे पुरेसे उत्पादन, खरेदी आणि उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित गट आणि अधिकाऱ्यांना दिले.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1611041) आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Kannada , Malayalam