रसायन आणि खते मंत्रालय
इंडियन पोटॅश लि.ने पंतप्रधान मदत निधीला 5 कोटी रुपये दिले तर रासायनिक खते पीएसयूने 32 कोटींचे दिले योगदान
गौडा यांचे एनएफएल आणि एफएसीटी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार देण्याचे आवाहन
Posted On:
03 APR 2020 4:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020
केंद्रीय रासानिक खते, रसायने आणि खत मंत्रालयाच्या अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या इंडियन पोटॅश लिमिटेडने (आयपीएल), कोविड-19 विरोधातील लढा देताना सरकारला पाठिंबा म्हणून आपत्कालीन परिस्थितीतील पंतप्रधानांच्या नागरिक सहायता आणि मदत निधीला (पीएम केअर्स)5 कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे (सीपीएसयू) रुपये 32 कोटींचे योगदान आहे.
इंडियन पोटॅश लिमिटेडच्या योगदानाचे कौतुक करीत, श्री गौडा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविड-19 च्या उद्रेकानंतर भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या मदतनिधीला बळकटी आणि पाठिंबा मिळेल.
रासायनिक खते विभागाच्या आयएफएफसीओ, केआरआयबीएचसीओ आणि एनएफएल – किसान आदी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी देखील पंतप्रधान मदत निधीला २७ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे योगदान दिले आहे.
गौडा यांनी त्यांच्या मंत्रालयातील नफा मिळविणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील अन्य उपक्रमांना देखील त्यांनी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधी म्हणून पंतप्रधान मदत निधीला योगदान द्यावे, असे आवाहन करणारे पत्र सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या प्रमुखांना दिले आहे. श्री. गौडा म्हणाले, भारत सरकार आपल्यापरीने प्रतिबंध आणि प्रसार रोखण्यासाठी सर्व योग्य ती पावले उचलत आहे, तथापि, सार्वजनिक आरोग्याची सध्याची परिस्थिती पाहता समाजातील सर्व क्षेत्रातून प्रयत्न होण्याची गरज आहे, म्हणून पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स) आपण सर्वांनी आपल्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीमधून अधिकाधिक रकमेचे योगदान द्यावे, अशी विनंती करतो. कंपनी कायदा 2013 अंतर्गत सीएसआर खर्च म्हणून हा निधी पात्र होईल.
ट्विट्सच्या लिंक पुढीलप्रमाणे –
1.(https://twitter.com/DVSadanandGowda/status/1245620869944070146?s=03)
2. (https://twitter.com/DVSadanandGowda/status/1245957819255287808?s=03)
3.(https://twitter.com/DVSadanandGowda/status/1245955359002386433?s=03)
B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar
(Release ID: 1610747)
Visitor Counter : 159