मंत्रिमंडळ

भारत आणि रशिया यांच्यातल्या रेल्वे क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला मंत्री मंडळाची मंजुरी

Posted On: 12 JUN 2019 8:11PM by PIB Mumbai

भारतीय रेल्वे मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या आरेखन संशोधन आणि मानके संस्था आणि रशियामधली रेल्वे संशोधन संस्था तसेच रशियाची माहिती तंत्रज्ञान विषयक संशोधन, सिग्नल आणि रेल्वे वाहतूक संदेश संस्था यांच्यातल्या सहकार्य कराराची,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.

या सामंजस्य करारामुळे, माहिती, तज्ञांच्या बैठका,चर्चासत्र,तांत्रिक भेटी तसच संयुक्त मान्यता असलेल्या सहकार्य प्रकल्पांची अंमलबजावणी याबाबत आदान प्रदान सुलभ होणार आहे.

एप्रिल 2019 मधे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

***

B.Gokhale /N.Chitale 



(Release ID: 1574205) Visitor Counter : 64