मंत्रिमंडळ

भारत आणि कोस्टारिका यांच्यात जैवतंत्रज्ञान क्षेत्रातल्या इरादा पत्राला मंत्री मंडळाची मंजुरी

Posted On: 12 JUN 2019 8:15PM by PIB Mumbai

भारत आणि कोस्टारिका यांच्यात जैवतंत्रज्ञान क्षेत्रातल्या इरादा पत्रावर स्वाक्षऱ्या करण्याबाबत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.

जैवतंत्रज्ञान शिक्षण,प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात ठोस धोरणात्मक आराखडा आखण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान राजनीतीसाठी  सहयोगाकरिता कार्यक्रम निश्चित करण्यासाठी यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. 

मार्च 2019 मधे यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

****

 B.Gokhale /N.Chitale 



(Release ID: 1574201) Visitor Counter : 60