मंत्रिमंडळ

गो संवर्धनासाठी राष्ट्रीय कामधेनुआयोग स्थापन करण्याला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 9:33PM by PIB Mumbai

गाय आणि गो वंश संवर्धन, रक्षण आणि विकासासाठी, राष्ट्रीय कामधेनु आयोग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

परिणाम-

राष्ट्रीय कामधेनु आयोग स्थापन करण्यामुळे,देशातल्या  गो पशुधनाचा विकास, संवर्धन आणि संरक्षणाला चालना मिळणार आहे,त्याचबरोबर देशी वाणाचा विकास आणि संवर्धनही साध्य होणार आहे.

पशुधनाचा विकास झाल्यामुळे महिला तसेच छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. हा आयोग,पशुवैद्यक,प्राणी विज्ञान,कृषी विद्यापीठे यांच्याशी सहयोग राखत काम करेल.

पूर्वपीठीका

या आयोगाच्या निर्मितीमुळे,देशातल्या गो संवर्धन,आणि विकास कार्यक्रमाला धोरणात्मक ढाचा आणि दिशा प्राप्त होणार आहे.त्याचबरोबर गो कल्याणासाठीच्या कायद्याच्या  योग्य अंमलबजावणीची खातरजमा यामुळे होणार आहे.

***

BG/NC



(Release ID: 1563086) Visitor Counter : 85