मंत्रिमंडळ

उझबेकिस्तानमधल्या आदिजान प्रांतात भारत-उझबेक मुक्त औषध निर्माण क्षेत्र स्थापन करण्याविषयीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 26 SEP 2018 4:16PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.  या करारानुसार उझबेकिस्तानमधील आदिजान प्रांतात भारत-उझबेक मुक्त औषध निर्माण क्षेत्र स्थापन केले जाणार आहे. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष 1 ऑक्टोबर 2018 ला भारतात येणार असून त्यावेळी या करारावर स्वाक्षऱ्या होतील.  

दोन्ही देशांत औषध निर्माण उद्योगात होत असलेली वाढ लक्षात घेऊन या क्षेत्रातील व्यापार, औषध उत्पादन, संशोधन आणि विकास या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी एक औपचारिक यंत्रणा उभारण्याचा दोन्ही देशातील सरकारांचा प्रयत्न आहे. या सामंजस्य करारामुळे उझबेक-भारत मुक्त औषध निर्माण क्षेत्र स्थापन करण्यासाठीचा आराखडा तयार होऊ शकेल. या करारामुळे भारतीय औषध निर्माण कंपन्या आणि जैव औषध निर्माण कंपन्या उझबेकिस्तानमधल्या मुक्त औषध निर्माण क्षेत्रात गुंतवणूक करु शकतील तसेच त्यांना औषध निर्माण उत्पादनासाठी उझबेकिस्तानकडून सुविधा मिळू शकतील.

 ***

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar



(Release ID: 1547458) Visitor Counter : 57