मंत्रिमंडळ

भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान औषध निर्माण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 26 SEP 2018 4:12PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान औषध निर्माण क्षेत्रात सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यानुसार औषध निर्माण क्षेत्रात संशोधन आणि विकास तसेच व्यापार आणि उद्योग यात सहकार्य वाढवले जाणार आहे. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष 1 ऑक्टोबर 2018 ला भारतात येणार असून त्यावेळी या करारावर स्वाक्षऱ्या होतील.

दोन्ही देशांत औषध निर्माण उद्योगात होत असलेली वाढ लक्षात घेऊन या क्षेत्रातील व्यापार, औषध उत्पादन, संशोधन आणि विकास या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी एक औपचारिक यंत्रणा उभारण्याचा दोन्ही देशातील सरकारांचा प्रयत्न आहे. या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशात औषधांचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल तसेच व्यापार आणि नोंदणी प्रक्रिया, औषध उत्पादनासाठी आवश्यक कायदेशीर आणि नियमन प्रक्रिया, आयात-निर्यातीसाठी नियमन प्रक्रिया सुलभ होईल.

***

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar


(रिलीज़ आईडी: 1547455) आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam