पंतप्रधान कार्यालय

न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची भारताच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती

Posted On: 13 SEP 2018 7:18PM by PIB Mumbai
भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी भारताच्या मुख्य न्यायधीशपदी श्री रंजन गोगई यांची नियुक्ती केली असून ते आपला कार्यभार, वर्तमान न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या सेवा निवृत्तीनंतर म्हणजे दिनांक ऑक्टोबर , २०१८ ला स्वीकारतील.

दिनांक १८  नोव्हेंबर, १९५४  रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती गोगोई  यांनी १९७८  मध्ये वकील म्हणून नोंदणी केली होती. ते गौहाटी उच्च न्यायालयात संवैधानिक, कर आकारणी आणि कंपनी याविषयांवर अभ्यास करीत होते.

२८  फेब्रुवारी, २००१ रोजी त्यांना   गौहाटी उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. 9 सप्टेंबर 2010 रोजी त्यांना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात स्थानांतरित  करण्यात आले. 12 फेबुवारी, 2011 रोजी त्यांची  पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या  मुख्य न्यायमूर्ती पदी  नियुक्त करण्यात आली. त्यांची  23 एप्रिल 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

***

बी. गोखले



(Release ID: 1546119) Visitor Counter : 116