• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
गृह मंत्रालय

गरिबांना मोफत शिधा प्रदान करणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन


“पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला दिलेल्या मुदतवाढीतून गरिबांच्या हितासाठी पंतप्रधानांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दिसून येते” – अमित शहा

“या योजनेमुळे कोणीही उपाशी झोपले नाही. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचे आभार” – अमित शहा

अमित शहा यांनी देशातील कष्टकरी शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली

Posted On: 30 JUN 2020 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2020

 

गरिबांना मोफत शिधा पुरविणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. 

पंतप्रधानांनी देशाला संबोधित केल्यानंतर अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये, देशातील कष्टकरी शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, ज्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण आज या परीक्षेच्या घडीला गरजू लोकांना सहाय्य करत आहे.  

केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, “पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला दिलेल्या मुदतवाढीतून गरिबांच्या हितासाठी पंतप्रधानांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दिसून येते. कोणीही उपाशी झोपणार नाही हे सुनिश्चित करणाऱ्या अशा या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.


 

 

 

* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1635480) Visitor Counter : 174


Link mygov.in